Bigg Boss Marathi 2, August 24, Episode 91 Update: वीणाचे घरातील वागणे पाहून आरोहने व्यक्त केला रोष, महेश  मांजरेकर यांनी फिनालीमध्ये पोहचल्याने दिल्या शिवानी आणि नेहाला शुभेच्छा
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या घरात आज अचानक नेहाचा सर्वात जवळचा मित्र जितेंद्र जोशी याच्या येण्याने घरातील सदस्य आनंदी होतात.  जितेंद्र येताच तो घरातील सदस्यांना त्यांनी लिहिलेल्या कविता ऐकवून दाखवतो.  मात्र नेहमी प्रमाणेच बिचुकले यांची घरातील अन्य सदस्य जितेंद्रच्या समोर मस्करी करताना दिसून येतात. बिग बॉस जितेंद्रचे स्वागत करतात पण बिग बॉस कसे दिसतात याच्यावरुन विविध प्रश्न उपस्थित करत घरातील सदस्यांना हसवतो.त्यानंतर महेश मांजरेकर यांची एन्ट्री होत पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्याचे  प्रेक्षकांना आवाहन  करतात.

या आठवड्यातील बेस्ट परफॉर्मर वीणा आणि आरोहचे नाव महेश मांजरेकर घोषित करतात. त्याचसोबत शिवानी ही सारखी वीणाच्या नावाने सारखी का राग व्यक्त करते याबद्दल प्रश्न उपस्थित करतात.  त्यानंतर वीणा हिच्याकडून शिवानीच्या वागणुकीबद्दल महेश मांजरेकर यांना सांगते. तसेच वीणा हिने तिचे बिग बॉसपूर्वीचे प्रेमसंबंधाबद्दल सांगत शिवानी हिने तिच्या नात्यावर प्रत्येक वेळी कसे आरोप केले याबद्दल सुद्धा सांगते. एवढेच नाही तर शिव याने वीणाच्या नावाने हातावर काढलेल्या टॅटुमुळे शिवानी त्याचे कानभरते असे सुद्धा मांजेरकर यांना सांगितले जाते.  तर वीणाच्या How Dare She (शिवानी)  चुकीच्या शब्दामुळे तिला मांजेरकर यांच्याकडून समज दिली जाते. त्याचसोबत घरातील जुन्या सदस्यांनी किंवा प्रेक्षकांनी माझ्यावर दया  केली नाही हा शब्द वापरल्याने संताप व्यक्त करण्यात आला. (Bigg Boss Marathi 2, Episode 91 Preview: शिवने हातावर वीणाच्या नावाने काढलेल्या टॅटूवरुन झाला वाद; दोघींच्या वागण्याचा काय होणार परिणाम?)

घरात वीणा आणि शिव यांचे घरात कोणत्या गोष्टींबाबत चोचले आहेत याची उदाहरणे महेश मांजरेकर यांना दाखवून देतो. तर शिवानी हिने बनवलेले जेवण मी खाणार नाही असे किशोरी हिला वीणाने सांगितल्याचे कबुल करते. यावर शिवानी हिने तिच्याबद्दल केलेले वक्तव याचे स्पष्टीकरण देत वीणा कशी आहे याचे सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न करते. एपिसोडच्या शेवटी अभिजित बिचुकले गाणं बोलत सर्वांचे मनोरंजन करतात.