बिग बॉस 2 चे पर्व संपण्यासाठी आता अवघे काहीच दिवस राहिले आहेत. कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने वाढदिवसाच्या पार्टिचे आयोजन केले होते. त्यावेळी घरातील मंडळी या पार्टीत आनंदी दिसून आले. परंतु नॉमिनेशनच्या प्रक्रियेत वीणा, शिव, किशोरी आणि आरोह हे सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी शिवने हातावर वीणाच्या नावाने काढलेल्या टॅटूवरुन वादाला सुरुवात झाली आहे. शिवानी आणि वीणा या दोघी एकमेकांचा नेहमीच घरात राग करताना दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता फिनालीसाठी काही दिवस राहिले आहेत तरी त्यांच्यामधील काही वाद मिटलेले नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान शिवानी हिला वीणा मुर्ख म्हणाल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्यास दोघींनी सुरुवात केली आहे. तसेच वीणा हिचे नावाने शिवानी सारखी शंख फोडत असल्याचे येथे बोलण्यात येते. मात्र या दोघींच्या वागण्याचा शेवट आणि परिणाम काय होणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2, August 23, Episode 90 Update: अनोख्या पद्धतीने सदस्यांनी साजरा केला बिग बॉसचा वाढदिवस; बिचुकले आणि नेहाच्या भांडणाने लागले गालबोट)
शिवने काढलेल्या Tattoo वरून वीणा आणि शिवानीमध्ये सुरू झालाय वाद. पाहा #BiggBossMarathi2 #WeekendChaDaav आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. pic.twitter.com/qFdpxLxKSC
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 24, 2019
तसेच बिग बॉसच्या फिनालेमध्ये नेहा आणि शिवानी या दोघी पोहचल्याने त्या आनंदात आहेत. परंतु प्रेक्षकांनी या दोघींना फिनालीमध्ये जाण्याचे तिकिट मिळाल्याने नाराजगी व्यक्त केली आहे. तर किशोरी, वीणा, शिव आणि आरोह या सदस्यांना सुद्धा फिनालेपर्यंत पोहचण्याची एक संधी बिग बॉसने दिली . मात्र घरातील सदस्यांच्या वागणुकीमुळेच ती संधी हुकली गेली आहे.