Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसचा (Bigg Boss) खेळ आता उत्तरार्धात सुरु झाला असून अवघे काही दिवसातच यंदाचा विजेता कोण असणार हे घोषित केले जाणार आहे. मात्र बिग बॉसच्या घरातून दर आठवड्याला एक व्यक्ती घरातून निघून जातो.  तसेच आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एक सदस्य घराचा निरोप घेणार आहे. तत्पूर्वी विकेंडच्या डावमध्ये आज दोन महत्वाच्या घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

घरातील सदस्यांना Emoji नावाचा खेळ खेळण्यास बिग बॉस देणार आहेत. यामध्ये किशोरी आणि अभिजित बाटला हाउस मधील ओ साकी साकी या गाण्यावर डान्स करणार आहेत. तर किशोरी शहाणे यांचा डान्स पाहण्यासारखा असून अभिजित बिचुकले सुद्धा त्यांच्यासोबत थिरकताना दिसून येणार आहेत. या डान्सदरम्यान घरातील सदस्य सुद्धा या दोघांच्या डान्सचा आनंद घेताना दिसून येत आहेत.(Bigg Boss Marathi 2, August 17, Episode 84 Updates: अभिजित बिचुकले यांनी दिली बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची धमकी; वीणा आणि शिवच्या प्रेमप्रकरणावर सर्वजण नाराज)

Colors Marathi ट्वीट:

तर दुसऱ्या बाजूला घरातील सदस्यांच्या भविष्याचा पाढा वाचण्यासाठी सुप्रसिद्ध राशीतज्ञ शरद उपाध्ये येणार आहेत. त्यावेळी शिव आणि वीणा यांच्या नात्याबद्दल पुढे काय होणार याचा खुलासा करण्यात येणार आहे. तसेच घरातील अन्य सदस्यांच्या भविष्याबद्दल गुरुजी काय सांगणार हे पाहणे उत्सुकतचे ठरणार आहे.