बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात आज ब्रेकिंग न्यूजचा (Breaking News) टास्क रंगणार आहे. या टास्कमुळे घरातील सदस्यांमध्ये उत्सुकता तर आहेच. मात्र नेहमीप्रमाणेच या टास्कला सुद्धा वादाचे वळण लागताना दिसून येणार आहे. घरात पाहुणे म्हणून एन्ट्री केलेल्या अभिजित बिचुकले यांच्या येण्याने घरातील वातावरण जरी खेळीमेळीचे झाले आहे. तरीही त्यांचा राग मात्र आवरला जात नाही आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजच्या टास्कदरम्यान बिचुकले यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे घरात राडा होणार आहे.
बिचुकले हे या टास्कमध्ये रिपोर्टरची भुमिका साकारत आहेत. तर किशोरी यांनी शिवानी आणि आरोह यांनी लग्न केले आहे असा प्रश्न केला असता बिचुकले यांनी यावर रिपोर्टिंग करण्यास सुरुवात करतात. रिपोर्टिंग करत असताना बिचुकले यांनी हे खरे प्रेमप्रकरण होत की नाटक असा सवाल उपस्थित करतात. यावर वीणाला राग येत ती बिचुकले वैयक्तिकरित्या एखाद्याला बोलत असल्याचे मत व्यक्त करते.यानंतर बिचुकले आणि शिवमध्ये वाद होताना आजच्या एपिसोड मध्ये दिसून येणार आहे. तर या वादाचा शेवट नेमका काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2, August 15, Episode 82 Update: बिग बॉसच्या घरात मेघा आणि रेशम यांच्यामध्ये रंगला पाकस्पर्धेचा टास्क; सुशांत आणि त्याची टीम ठरले साप्ताहिक कार्यात विजयी)
ब्रेकिंग न्यूज टास्कमधील अभिजित बिचुकलेंच्या वक्तव्यांमुळे घरात होणार का पुन्हा राडा...
पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @imsurveshivani @ArohWelankar @officialveenie @shivthakare_ @GmKishori pic.twitter.com/KjPhSsKk00
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 16, 2019
तसेच टास्कदरम्यान ऐन सणासुदीच्या दिवशी शिवानीला अचानक चक्कर येत तातडीची वैद्यकिय गरज भासणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.मात्र शिवानीला आलेली चक्कर ही तिला असणाऱ्या वैयक्तिक आजारामुळे आली हे की यापाठी आणखी कोणते दुसरे कारण आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आजचा बिग बॉसचा एपिसोड नक्की पाहा.