Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

भाराताचा 73 वा स्वातंत्र्य दिन सोहळा आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. जगाशी सारा संबंध तोडला असला तरीही आज बिग बॉस मराठी 2 च्या घरातही स्वातंत्र्य दिन 2019 चं सेलिब्रेशन होणार आहे. बिग बॉसच्या घरात 12 व्या आठवड्यात एकमेकांशी भिडणारे सदस्य 'रंग दे बसंती' गाण्यावर नाचत जल्लोष करताना दिसणार आहेत. आज बिग बॉसच्या घरातही 'जुना गडी नवं राज्य' या साप्ताहिक कार्यामधून वेळ काढत सारे सदस्य स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.

बिग बॉस मराठी 2 च्या घरात मागील सीझनचे तीन सदस्य आले आहेत. यामध्ये बिग बॉस 1 ची विजेती मेघा धाडे, सदस्य रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार यांचा समावेश आहे. तीन टीम्समध्ये सध्या घरात एक टास्क खेळून घरातील विविध भागांवर कब्जा मिळवायचा आहे. पहा आत्तापर्यंत काय झालंय बिग बॉसच्या घरात 

स्वातंत्र्यदिन 2019 चा जल्लोष

घरातील काही सदस्तांनी तिरंगी वेशभूषेमध्ये या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला आहे.

शिवानी सुर्वेची हळवी कविता

घरात हेवेदावे, भांडणं, रूगवे फुसवे सुरू असतात. पण यामधून आता अटीतटीच्या होणार्‍या खेळात काही स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. या नातेसंबंधांवर भाष्य करणारी एक कविता आज शिवानीने घरातील सदस्यांसमोर सादर केली आहे. पहा आजच्या भागाची झलक 

यंदाच्या आठवड्यात शिव ठाकरे आणि हीना पांचाळ हे दोन स्पर्धक घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत.