Bigg Boss Marathi 2, Episode 77 Preview: विकेंडच्या डाव मध्ये महेश सरांनी विचारला अभिजित बिचुकले यांना किशोरी शहाणे यांच्यावरुन विचारला प्रश्न, काय उत्तर देणार? (Video)
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसचा (Bigg Boss) शो आता उत्तरार्धाकडे सुरु झाला आहे. याच पार्श्वभुमीवर घरातील सदस्यांना कप्तानपदासाठी खांब खांब नावाचा टास्क देण्यात आला होता.या टास्कमध्ये किशोरी शहाणे विजेत्या असायला हव्या होत्या असे अभिजित बिचुकले यांनी आरोह सोबत बोलणे केले होते. यावरुन मात्र आज विकेंडच्या डावमध्ये महेश मांजरेकर यांनी बिचुकले यांना किशोरी या विजेत्या का आहेत याबद्दल प्रश्न विचारला.

बिचुकले यांनी असे म्हटले की, टास्कदरम्यान खांब्याला प्रथम किशोरी यांचा फोटो लावला गेला होता. मात्र यावर महेश सरांनी सुद्धा सांगितले की त्या खांबाला वीणाचासुद्धा फोटो लागला होता.या सर्व प्रकारावर बिचुकले गोंधळात पडलेले दिसल्याने त्यांना यावर काहीच उत्तर देता आले नाही. परंतु बिचुकले अधिक काही बोलणार का हे पाहण्यासाठी आजचा भाग पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2, 8 August, Episode 75 Updates: अभिजीत बिचुकले यांच्या हटके डान्सवर बिग बॉसच्या घरातील स्पर्धक फिदा; येरे येरे पैसा 2 चित्रपटाची टीमही खूश)

या आठवड्यासाठी नेहाला कप्तानपद मिळाले आहे. तर बाथरुमच्या ड्युटीवरुन बिचुकले यांच्या हलगर्जीमुळे घरातील अन्य सदस्यांनी नेहाकडे तक्रार केली. यावर बिचुकले यांनी मी माझ्याप्रमाणे काम केले आहे. त्यामुळे तुम्ही मला काही सांगू नका असे बोलतात. त्याचसोबत बाथरुम हे शॅम्पू वापरुन स्वच्छ केले जात नाही याची ताकिद दिली जाते.