
Bigg Boss Marathi 2, 8 August, Episode 75 Updates: बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले यांनी मेरे अंगने में.. गाण्यावर केलेला डान्स पाहून बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आणि येरे येरे पैसा 2 चित्रपटाची टीम चांगलीच खूश झाली. मुलीच्या वेशात अभिजीत बिचुकले हे एक भयंकर प्रकरणच दिसत होते. परंतू, अत्यंत उत्साहाने त्यांनी हा डान्स केला.
संजय नार्वेकर यांनी अभिजीत बिचुकले यांना इयत्ता चौथीतील मुलगी होण्याचा टास्क दिला होता. अभिजीत बिचुकले मुलगी होते तर, किशोरी शहाणे या बिचुकले यांच्या आई झाल्या होत्या. त्यांनीच बिचकुले यांना मेकअप करुन तयार केले होते. बिचुकले हे मुलीच्या वेशात नाचताना सुरुवातीला बिचकले होते. पण, नंतर त्यांनी छान डान्स केला. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 7 August, Episode 74 Updates: अभिजीत बिचुकले झाले राजे, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी लावली बोली, चौघे नॉमिनेट)
बिग बॉसच्या घरावर रेड
बिग बॉसच्या घरात आज (गुरुवार, 8 ऑगस्ट 2019) अज्ञात व्यक्तींकडून रेड पडली. सुरुवातीला घरातील सदस्य चांगलेच दचकले. पण, हे बुरखाधारी लोक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नव्हते कोणी नव्हते तर, येरे येरे पैसा 2 चित्रपटातील कलाकार प्रसाद ओक आणि मंडळी होते. बिग बॉसच्या घरात कालपासून हिरा शोधण्यासाठी चोरावर मोर हा टाक्स सुरु होता. परंतू हा टास्क बराच कंटाळवाणा झाला होता. बुरखाधारी व्यक्तींनी टाकलेल्या रेडमुळे त्यात काहीशी रंजकता आली इतकेच.