Bigg Boss Marathi 2, 7 August, Episode 74 Updates: अभिजीत बिचुकले झाले राजे, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी लावली बोली, चौघे नॉमिनेट
बिग बॉसच्या घरात आज 'एक खून माफ' या टास्कने भलतीच रंगत आणली. बिग बॉसने अभिजीत बिचुकले यांना थेट राजा केले. तर इतर स्पर्धकांना सहकारी स्पर्धकांना नॉमिनेट करण्यासाठी बोली लावण्यास सांगितले. काय घडलं आजच्या एपिसोडमध्ये घ्या जाणून.
Bigg Boss Marathi 2, 7 August, Episode 74 Updates: बिग बॉसच्या घरात आज 'एक खून माफ' या टास्कने भलतीच रंगत आणली. बिग बॉसने अभिजीत बिचुकले यांना थेट राजा केले. तर इतर स्पर्धकांना सहकारी स्पर्धकांना नॉमिनेट करण्यासाठी बोली लावण्यास सांगितले. घरातील स्पर्धकांनी 'अर्थ'पूर्ण विचार करत एकमेकांना नॉमिनेट केले. काही स्पर्धकांनी आपण सहसदस्याला का नॉमिनेट करत आहोत याचे स्पष्टीकरण दिले तर काही स्पर्धकांनी ते दिले नाही. काय घडलं आजच्या एपिसोडमध्ये घ्या जाणून.
काय होता टास्क?
बिग बॉस विजेत्या स्पर्धकास एक ट्रॉफी आणि पंचवीस लाख रुपये मिळणार होते. आजच्या टास्कमध्ये स्पर्धकांना या पंचवीस लाखांपैकी 50 हजार ते 5 लाख रुपये या पटीत पैशांची बोली लाऊन घरातील स्पर्धकांना नॉमिनेट करायचे होते. जो सदस्य अधिक बोली लावेल तो सदस्य घरातील सदस्यास नॉमिनेट करु शकत होता. त्यामुळे बिग बॉसने ठरवून दिलेल्या दोन-दोन स्पर्धकांच्या गटातील स्पर्धकापैकी जो स्पर्धक ज्या स्पर्धकार अधिक बोली लावेल तो थेट नॉमिनेट होत होता. बिग बॉसच्या घरात एकूण 25 लाख रुपयांच्या रकमेपैकी नऊ लाख पंचाहत्त हजार रुपयांची बोली लावली. तर, पंधरा लाख पंचवीस हजार रुपये शिल्लख राहिले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, Episode 74 Preview: बिग बॉसच्या घरात होणार संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री यांची एन्ट्री; आज रंगणार 'एक खून माफ’ नॉमिनेशन टास्क)
घरातील स्पर्धकांकडून बोली लावून नॉमिनेट झालेले सदस्य
शिव ठाकरे
अभिजीत केळकर
अरोह वेलणकर
किशोरी शहाणे
कोणी कोणास किती लावली बोली?
नेहा शितोळे हिने 50 हजारांची बोली लाऊन अभिजित केळकर याच्यासाठी 50 हजाराची बोली लावली. शिवाणी सुर्वे हिने शिव ठाकरे याच्यासाठी पंचाहत्तर हजार रुपयांची बोली लावली.
अरोह वेलणकर यांनी अभिजीत केळकर याच्यासाठी पाच लाख रुपयांची बोली लावली. मात्र, अरोह वेलणकर याने थेट पाच लाखांची बोली लावल्यामुळे अभिजीत केळकर याला बोलीच लावता आली नाही.
शिव ठाकरे याने अरोह वेलणकर याच्यासाठी 50 हजारांची बोली लावली. तर, किशोरी शहाणे यांनी अरोह वेलणकर याच्यासाठी एक लाख रुपयांची बोली लावली.
विणा जगताप हिने शिवाणी सुर्वे हिच्यावर 50 हजारांची बोली लावली. तर, हिना पांचाळ हिने शिवानी सुर्वे हिच्यावर 1 लाख रुपयांची बोली लावली.
येरे येरे पैसा 2 चे प्रमोशन
दरम्यान, आजच्या एपिसोडमध्ये येरे येरे पैसा 2 चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेते संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री आणि अभिनेत्री गोडबोले यांनी उपस्थिती दर्शवली. घरात आलेल्या पाहुण्यांनी घरातील सदस्यांसोबत धमाल मस्ती केली. तसेच, एक टास्कही खेळला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2019 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

