Bigg Boss Marathi 2, Episode 74 Preview: बिग बॉसच्या घरात होणार संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री यांची एन्ट्री; आज रंगणार 'एक खून माफ’ नॉमिनेशन टास्क
बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये 'एक खून माफ’ हे नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. यामध्ये तुम्हाला बोली लावून समोरच्या सदस्याचा खून करायचा आहे. या कार्यात कोण करणार कोणाचा खून करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या आठवड्यात खेळला गेलला कप्तानपदाचा टास्क हा गाजला तो हीनाच्या कन्फुजनमुळे. ज्याचा फटका तिला चांगलाच बसला. हा बिग बॉसच्या खेळ हा अंतिम चरनाकडे मार्गस्त होत आहे त्यामुळे सदस्याचे प्रत्येक वागणे, बोलणे हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये 'एक खून माफ’ हे नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. यामध्ये तुम्हाला बोली लावून समोरच्या सदस्याचा खून करायचा आहे. या कार्यात कोण करणार कोणाचा खून करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
#BiggBossMarathi2 च्या घरात सुरू झालेल्या 'एक खून माफ' या Nomination कार्यात कोण करणार कोणाचा खून? पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @imsurveshivani @ArohWelankar @abhijeetkellkar @officialveenie @GmKishori @TheHeenaPanchal pic.twitter.com/1hxcLJZaUh
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 7, 2019
सुरुवातीला छत्तीसचा आकडा असलेले वीणा आणि शिव घरातील चर्चित लव्हबर्डस बनले आहेत. वीणाला इम्प्रेस करण्यासाठी याआधी शिवने अनेक फंडे वापरले आहेत, मात्र आजच्या भागात वीणा शिवला एका गोष्टीने इम्प्रेस करणार आहे. वीणाने आपल्या भुवया आणि पापण्या यांच्यामधील जागेत शिवचे नाव लिहिले आहे. यावर घरातील इतर सदस्यांची काय प्रतिक्रिया असेल ते आज समजेलच
वीणाने शोधून काढली नाव लिहिण्याची नवी जागा, पण नक्की कोणाचं नाव लिहिलंय वीणाने? पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @officialveenie @shivthakare_ pic.twitter.com/sfk5gEueEw
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 7, 2019
घरातील सदस्यांना भेटायला आलेत काही खास पाहुणे. पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @officialveenie @Nehashitolefc1 @imsurveshivani @abhijeetkellkar @TheHeenaPanchal @GmKishori @ArohWelankar pic.twitter.com/nQkkPaXmb9
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 7, 2019
आजच्या भागात घरात काही पाहुण्या कलाकारांचे आगमना होणार आहे. ‘ये रे ये रे पैसा 2’ या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिगबॉसच्या घरात येणार आहे. संजय नार्वेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी गोडबोले आदी कलाकार यात समाविष्ट असतील. तर हे अवलिये घरातील सदस्यांना भेटल्यावर काय धमाल उडते ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिलेल.
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2019 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

