Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, Episode 62 Highlights: बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात सुरु असलेल्या 7/12 या साप्ताहीक कार्यातील तिसऱ्या राऊंडमध्ये Team B ला 109 रोपं वाचवण्यात यश येते. त्यामुळे दोन्ही टीम्सची रोपांची संख्या पाहता टीम  A कडे 335 आणि टीम B कडे 296 रोपं असतात. त्यामुळे साहजिकच टीम A विजयी होते. दरम्यान रोपांच्या संख्येवरुन टीम B मधील सदस्यांच्या मनात शंका उपस्थित होते. त्यावर बिग बॉसने स्पष्टीकरण दिल्यावर मात्र टीम B मधील सर्व सदस्य बिग बॉसची जाहीरपणे माफी मागतात.

त्यानंतर घरात वधू-वर सूचक मंडळ असा एक लक्झरी टास्क रंगतो. यात मुलगी आणि मुलगा यांचे दोन कुटुंब बनवून त्यात आपल्या बाजू मांडण्याची संधी दोन्ही कुटुंबाना दिली जाते. तर यात आरोह आणि शिवानी हे वधू-वर सूचक मंडळातील समुपदेशकाच्या भूमिकेत असतात. (Bigg Boss Marathi 2, Episode 62 Preview: बिग बॉस च्या घरात रंगणार वधू-वर सूचक मंडळ लक्झरी टास्क, वीणा जगताप आणि शिव ठाकरे वधू-वर पक्ष एकमेकांवर करणार हेवे-दावे)

मुलीचे कुटुंब:

# वीणा- मुलगी

# किशोरी- आई

# अभिजीत- वडील

# हीना- बहीण

मुलाचे कुटुंब

# शिव- मुलगा

# नेहा- आई

# माधव- वडील

# रुपाली- बहीण

तर यात दोन्हीही कुटुंब वीणा आणि शिवच्या नात्यात येणाऱ्या दुराव्याबद्दल आपआपली मतं मांडतात. तसंच शिव-वीणा ही आपली बाजू स्पष्ट करतात. अखेर मुलीच्या कुटुंबामुळे दोघांच्या नात्यात अडथळा येत असल्याचे समुपदेशकांकडून स्पष्ट करण्यात येते.

त्यानंतर घरात mi TV संदर्भातील विशेष कार्य सदस्यांवर सोपवण्यात आले. त्यात दोन-दोन सदस्यांच्या टीम करुन त्यानंतर कलर्स वाहिनीवरील मालिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या कार्याची संचालिका नेहा होती तर किशोरी ताई टाईम किपरच्या भूमिकेत होत्या. यातील पहिली टीम होती शिवानी-माधव, दुसरी टीम आरोह-अभिजीतची होती. तिसऱ्या टीममध्ये होते वीणा-शिव. तर चौथी टीम हीना-रुपालीची होती. या चारही टीमपैकी फक्त वीणा आणि शिव या जोडीला प्रश्नाचे उत्तर अचूक ओळखता आल्याने लक्झरी बजेट मिळणारी ती पहिली आणि एकमेव टीम ठरली. हा टास्क घरातील सर्व सदस्यांनी खूप एन्जॉय केला.