Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Voot)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात रोज काही ना काही घडामोडी घडतच आहेत. नुकतीच पाहुणी स्पर्धक म्हणून रिएन्ट्री झालेली शिवानी सुर्वे (Shivani Surve) आता घरची कॅप्टन होऊन पुन्हा एकदा घरची स्पर्धक बनली आहे. तर दुसरीकडे घरातून बाहेर काढले गेलेले अभिजीत बिचुकले यांचाही बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश होण्याची शक्यत निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सध्या बिग बॉसच्या घरात सुरु असलेले वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिव ठाकरे (Shiv Thakre) यांचे गुलाबी प्रेम सध्या बिग बॉसच्या घरासोबत प्रेक्षकांमध्येही बरेच चर्चेत आहे. त्याच धर्तीवर आज या घरात वधू-वर सूचक मंडळ हे लक्झरी टास्क रंगणार आहे. यात काही स्पर्धक वधू वीणाच्या बाजून तर काही शिव म्हणजेच वराच्या बाजूने आपली बाजू मांडताना दिसतील.

या टास्कमध्ये वीणा जगतापच्या बाजूने अभिजीत केळकर, हिना पांचाळ (Heena Panchal) आणि किशोरी शहाणे (Kishori Shahane) असून शिवच्या बाजूने नेहा शितोळे (Neha Shitole), रुपाली भोसले (Rupali Bhosle) आणि माधव देवचक्के असणार आहेत. हे दोन्ही पक्ष आपल्या मुलाची आणि मुलीची बाजू मांडताना दिसतील. त्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांवर हेवेदावे करताना दिसतील.

यात अंतिम निकाल काय लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पाहा व्हिडिओ-

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, Episode 61 Updates: 7/12 या साप्ताहिक कार्याचा दुसरा दिवस खेळापेक्षा अधिक वाद, बाचाबाची आणि हातापायीने रंगला

तर दुसरीकडे शिवानी सुर्वे मागील टास्क मधील किशोरी शहाणे यांना जी अपमानस्पद शब्द बोलली होती, त्याबाबत ती किशोरी शहाणे यांची मनधरणी करताना दिसणार आहे.

थोडक्यात आजचा भाग खूपच हॅपनिंग आहे. वधू-वराच्या बाजूने असलेले पक्ष खरच टास्कनुसार आपली बाजू मांडणार की त्याच्याद्वारे आपल्या मनातील भडास बाहेर काढणार हे आज रात्री आपल्याला पाहायला मिळेल.