बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) च्या घरातून शिवानी सुर्वे (Shivani Surve)पाठोपाठ अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे या दोघांना अचानक एक्झिट घ्यावी लागल्याने आता नवे वाईल्ड कार्ड कोण असणार? याची रसिकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. कालच्या (3 जुलै) भागात बिग बॉस 1 च्या पर्वातील पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत यांनी एन्ट्री घेतली आहे. आता यांच्यापैकी सई बिग बॉस मराठी 2 च्या घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री ठरणार अशी शक्यता आहे. आजच्या बिग बॉस मराठी 2 च्या एपिसोड प्रोमोमध्ये त्याबाबतचे संकेत दिले आहेत. पहा आजच्या भागात काय होणार?
बिग बॉसच्या घरात सध्या 'BB Hotel' हे साप्ताहिक कार्य सुरू झालं आहे. यामध्ये पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत अतिथी म्हणून दाखल झाले आहेत तर त्यांचं आदरातिथ्य करताना घरातील स्पर्धकांची दमछाक होत आहे. पहा आत्तापर्यंत काय झालं बिग बॉसच्य घरात?
पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात वाद रंगत असल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. आजारपणाचं कारण पुढे करत शिवानी घराबाहेर पडली आणि हीना पांचाळची एन्ट्री झाली. आता खरंच सई दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री असेल की हा फक्त स्टंट किंवा प्रेक्षकांना आणि घरातील लोकांना खिळवून ठेवण्याचा एक प्रकार आहे हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.