Bigg Boss Marathi 2, 3 July, Episode 39 Updates: बिग बॉसच्या घरात पाहुणे पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत यांनी स्पर्धकांना नाचवले
Sai Lokur | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 3 July, Episode 39 Updates: बिग बॉसच्या घरात आज पाहुणे म्हणून बिग बॉस पर्व एक चे स्पर्धक राहिलेले पुष्कर जोग (Pushkar Jog), सई लोकूर (Sai Lokur), स्मिता गोंदकर (Smita Gondkar) आणि शर्मिष्ठा राऊत ( Sharmishtha Raut) हे पाहुणे म्हणून आले. आलेल्या पाहुण्यांची सेवा हाच घरातील स्पर्धकांना बिग बॉसने टास्क दिला होता. हा टास्क पुरा करताना घरातील सदस्यांना अक्षरश: नाकी नऊ आले. पाहुण्यांनी आपली सेवा करुन घेत स्पर्धकांना चांगलाच इंगा दाखवला. दरम्यान, सई लोकुर हिला बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळणार का याबाबत उत्सुकता आहे.

काय होता टास्क?

बिग बॉसच्या घरात खास पाहुणे येणार असल्यामुळे बिग बॉसचे बंद पडलेले हॉटेल पुन्हा तयार करुन पाहुण्यांना खास सेवा सदस्यांनी द्यायची आहे. घरातील सदस्यांनी पाहुण्यांची मनं जिंकून त्यांच्याकडून स्टार मिळवायचे आहेत. ज्या टीमला अधिक स्टार मिळतील ती टीम विजयी होईल. जी टीम पराभूत होईल त्या टीमला पुढच्या आठवड्यात नॉमिनेशनचा धोका आहे. तसेच, पराभूत झालेल्या टीममधील सदस्यांपैकी दोन सदस्य पुढच्या आठवड्यात थेट नॉमिनेट होऊ शकतात. त्यामुळे पाहुण्यांचे मन जिंकून त्यांच्याकडून अधिकाधिक स्टार घेणे हा घरातील स्पर्धकांसाठी हा टास्क होता.

टास्कसाठी टीम ए - किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, रुपाली भोसले

टास्कसाठी टीम बी - नेहा शितोळे, वीणा जगताप, अभिजित केळकर, माधव जगताप.

घरात एण्ट्री झाल्याबरोबर पाहुण्यांनी घरातील सदस्यांकडे कोणाकोणाला काय येते हे विचारुन घेतले. पाहुण्यांनी घरातील सदस्यांकडून मनोरंजन करुन घेतले. यात अभिजित केळकर याने गाणे म्हटले. तर, विणा जगताप हिने लावणी केली. त्यासाठी सुरेखा पुणेकर यांच्याकडून टिप्स घेतल्या. तर, हिना पांचाळ आणि शिव ठाकरे यांनी एकत्र केलेला डान्सही पाहुण्यांना पाहायला मिळाला. दरम्यान, किशोरी शहाणे यांनी गायलेल्या गाण्यावर विणा जगताप, नेहा शितोळे यांनी केलेला डान्सही पाहुण्यांना पाहायला मिळाला. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 2 July, Episode 38 Updates: बिग बॉसने डोंगर पोखरुन उंदीर काढला; घरातील सदस्यांनी उगाच गोंधळ घातला)

दरम्यान, टीम ए ला पाहुण्यांकडून दोन स्टार मिळाले. यात पुष्कर जोग याच्याकडून किशोरी शहाणे याच्यासाठी तर, शर्मिष्टा राऊत याच्याकडून सुरेखा पुणेकर यांना मिळालेल्या स्टारचा समावेश आहे.

सई लोकुर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात

दरमयान, एपिसोडच्या अगदी शेवटी बिग बॉसने सई लोकूर यांना बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळत असल्याचे जाहीर केले. अर्थात, बिग बॉस घरोखरच तिला एण्ट्री देणार की घरातील सदस्यांची शाळा घेणार हे उद्याच्या एपिसोडमध्ये कळू शकते.