Bigg Boss Marathi 2, 2 July, Episode 38 Updates: बिग बॉसने डोंगर पोखरुन उंदीर काढला; घरातील सदस्यांनी उगाच गोंधळ घातला
Bigg Boss Marathi 2, 2 July, Episode 38 Updates | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 2 July, Episode 38 Updates: मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर बिग बॉसच्या घरातही काहीतरी अपत्कालीन स्थिती घडली असे वाटत होते. किमान बिग बॉसने गेले एक दोन दिवस दाखवलेले पुढच्या एपिसोडचे प्रोमो पाहून तरी असे वाटत होते. मुंबई शहरातील सद्यस्थिती पाहता यात काही तथ्य असावे प्रेक्षकांनाही वाटत होते. त्यामुळे प्रोमोत दाखवलेल्या प्रसंगाबद्दल आजच्या एपिसोडमध्ये नेमके काय घडते याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, एपिसोडमध्ये तसे काहीच घडले नाही. बिग बॉसने दाखवलेले त्या प्रसंगाचे सर्व प्रोमो हे केवळ एका टास्कबाबत होते. त्यामुळे प्रेक्षकांना आपण आपल्या मनात उत्सुकता वाढवून घेऊन उगाच स्वत:ला गंभीर करुन घेतले असे वाटू शकते.

अपत्कालीन स्थितीच्या नावाखाली बिगबॉसने दिला टास्क

अपत्कालीन स्थितीच्या नावाखाली सायरन वाजवत बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावले. घरातील सदस्यांनाही वाटले की, खरोखरच काही अपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे, असे वाटल्याने बिग बॉसच्या आदेशानुसार घरातील स्पर्धक महिलांच्या खोलीत जमले. इथे बिग बॉसने या सदस्यांना बंद केले आणि त्यांच्यासमोर टास्क ठेवला.

काय होता टास्क

बिग बॉसने बंद खोलीत स्पर्धकांना टास्क दिला की, घरात जर आपत्कालीन स्थतिती निर्माण झाली तर, आपणाला या खोलीत कोणत्या स्पर्धकासोबत अडकून राहायला आवडेन. सर्व स्पर्धकांनी या प्रश्नांची उत्तरे देताच. बिग बॉसने याच टास्कमध्ये पुढील कार्य दिले की, अशा स्थिती आपणास कोणत्या स्पर्धकासोबत अडकून राहायला आवडणार नाही. या टास्कमध्ये घरातीस सदस्यांनी केलेल्या दुसऱ्या सदस्यांची निवड पुढील प्रमाणे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2: अभिजित बिचुकले जामीनासाठी ठोठावणार मुंबई उच्च न्यायालयाचे दार, बिग बॉसच्या घरात एंट्रीबाबत मात्र प्रश्नचिन्ह)

आपत्कालीन स्थितीत सोबत राहण्यासाठी सदस्यांनी केलेली निवड

अभिजित केळकर - वैशाली माडे

हिना पांचाळ - नेहा शितोळे

नेहा शितोळे - माधव देवचक्के

वैशाली माडे - अभिजित केळकर

सुरेखा पुणेकर - शिव ठाकरे

किशोरी शहाणे - रुपाली भोसले

शिव ठाकरे - सुरेखा पुणेकर

रुपाली भोसले - विणा जगताप

विणा जगताप - रुपाली भोसले

माधव देवचक्के - नेहा शितोळे

आपत्कालीन स्थितीत सोबत राहण्यासाठी नावडते सदस्यांची

विणा जगतप - माधव देवचक्के

हिना पांचाळ - विणा जगताप

नेहा शितोळे - सुरेखा पुणेकर

रुपाली भोसले - सुरेखा पुणेकर

सुरेखा पुणेकर - विणा शितोळे

शिव ठाकरे - हिना पांचाळ

किशोरी शहाणे - सुरेखा पुणेकर

माधव देवचक्के - किशोरी शहाणे

वैशाली भोसले - रुपाली भोसले

माधव देवचक्के - विणा जगताप

दरम्यान, आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने आणखी एक टास्क दिला. ज्यामध्ये प्रत्येक सदस्यासाठी गुणदान करायचे होते. हे गुणदान करताना प्रत्येक टीमने एकमत करुन निर्णय घ्यायचा होता. आजच्या एपिसोडमध्ये हा टस्क अपूर्ण राहील. त्यामुळे या टास्कमध्ये उद्या काय घडते याबाबत उत्सुकता आहे.