Bigg Boss Marathi 2, Episode 27 Preview: धोबीपछाड कार्यातील गैरवर्तणुकीमुळे दोन्ही टीम्सना disqualified करण्याचा निर्णय घेणार का संचालिका? (Watch Video)
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉस मराठी 2 च्या (BIgg Boss Marathi 2) घरात सध्या धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. या कार्यादरम्यान दोन्ही टीम्समध्ये डिल्स, वाद, आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. मात्र आता हा वाद नक्की काय वळण घेणार? यातून नेमकं काय निष्पन्न होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागाचा प्रिव्ह्यू पाहता दोन्ही टीम्स जोरदार भांडताना दिसत आहेत. यामुळे संचालिका दोन्ही टीम्सला disqualified करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहा प्रिव्ह्यू:

 

विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातील बहुचर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना आज सातारा पोलिसांनी थेट बिग बॉसच्या घरातून अटक केली. चेक बाऊंस प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. यापूर्वी वादग्रस्त विधाने, महिलांना अपशब्द वापरणे इत्यादी कारणामुळे बिचुकले चर्चेत होते.

यंदाच्या आठवड्यात ते नॉमिनेटही झाले होते. मात्र पोलिसांच्या अटकेमुळे बिग बॉसच्या घरातून त्यांची अचानक एक्झिट झाली.  बिचुकले यांच्या या एक्झिटमुळे खेळावर काय परिणाम होणार? घरांच्याची प्रतिक्रीया काय असणार? आणि एकंदर बिग बॉस चा शो नेमकं काय वळण घेणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.