बिग बॉस मराठी 2 (BIgg Boss Marathi 2) च्या घरात घरातील एक आगळावेगळा सदस्य म्हणून नेहमीच अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा घरातील एकंदरीत वावर, बोलणे, राहणीमान आणि काही खास मैत्रिणींशी असलेली सलगी नेहमीच त्यांना चर्चेत राहण्यात मदत करते. त्यात भरीस भर म्हणून की काय त्यांची प्रत्येक गोष्टीवर गाणे म्हणण्याची सवय लोकप्रिय झाली आहे. यापूर्वी बिग बॉसच्या घरातील शिवानी सुर्वे सोबत बिचुकले यांची चांगली गट्टी झाली होती. शिवानी बाहेर पडताच व्हाईड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) झालेली हीना पांचाळ हिच्याशी त्यांची सलगी झाली आहे. (अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव)
आजच्या भागात तर त्यांनी हीना साठी खास गाणे देखील गायले आहे. विशेष म्हणजे शिवानी घरात असताना त्यांनी शिवानीसाठी देखील गाणे गायले होते. हीनाला जवळ घेत बिचुकले यांनी 'माने या ना माने तू मेरी हो गई' हे गाणे तिच्यासाठी गायले. तर तुम्हीच पहा बिचुकलेंचा हा सुरेल अंदाज...
पहा व्हिडिओ:
'माने या ना माने तू मेरी हो गई' बिचुकल्यांनी समर्पित केलं एक गाणं हीनासाठी... पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर#HeenaPanchal #AbhijitBichukale pic.twitter.com/EwztYuilV1
— Colors Marathi (@ColorsMarathi) June 20, 2019
नॉमिनेशन टास्कमध्ये रुपाली सोबत झालेल्या भांडणानंतरही हीना बिचुकले यांना समजवताना दिसली. त्यानंतर बिचुकले यांनी हीनाकडून बॅक मसाजही घेतला होता. हीनाच्या एन्ट्रीनंतर बिचुकले यांनी हीनासोबत मैत्री तर केलीच आता तिच्यासाठी गाणे गाऊन मैत्री अधिक घट्ट करण्याचा बिचुकले यांचा प्रयत्न असावा.