Bigg Boss Marathi 2 Day 4 Episode Preview: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले रडले, पण काय नेमके काय घडले? (Video)
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits- Twitter)

सध्या कलर्स मराठीवर (Colors Marathi) रिअॅलिटी शो मराठी बिग बॉस 2 (Marathi Bigg Boss 2) च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. तसेच दररोज रात्री संध्याकाळी 9.30 वाजताच्या सुमारास हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळतोच. याच पार्श्वभुमीवर बिग बॉसच्या घरातील चौथ्या दिवशी स्पर्धकांमध्ये नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेच. तत्पूर्वी आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचा रोष ओढावलेले अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांचा अखेर संयम तुटला असल्याचे पाहायला मिळते. त्याचसोबत बिचुकले यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसून येत आहे.

आजचा बिग बॉसच्या घरातील चौथा दिवस आहे. तर आजवर पार पडत आलेल्या एपिसोडमध्ये अभिजित बिचुकले यांच्यावर कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाकडून त्यांच्या वागणूकीबद्दल टीका केली जात आहे. तसेच काहीजण त्यांच्या नावावरुन खिल्ली सुद्धा उडवत आहेत. मात्र आजच्या एपिसोडमदध्ये बिचुकले चक्क रडताना दिसून येणार आहेत. यावेळी त्यांना वैशाली म्हाडे आणि अभिजित केळकर धीर देताना पाहायला मिळणार आहे. परंतु बिचुकले यांना कोणाचे बोलणे खटकले आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2, 29th May 2019, Day 3 Episode Updates: नॉमिनेशन टास्कमुळे अभिजित आणि रुपालीवर आली रडायची पाळी; तर नऊवारी साडी नेसून विद्याधर यांनी सादर केली लावणी)

तर बुधावारी पार पडलेल्या बिग बॉसच्या घरातील तिसऱ्या दिवशी सुद्धा नेहा आणि पराग यांच्यामध्ये भांडण झाले. तसेच मैथिली आणि वीणा यांच्यामध्ये नॉमिनेशन टास्कला सुरुवात होऊन या दोघींना अनुक्रमे त्यांच्या जवळीक गोष्टी नष्ट करण्याचे आदेश बिग बॉसकडून दिले जातात.