Bigg Boss Marathi 2 Day 3 Episode Preview 'बिग बॉस'च्या घरातील बायकांच्या वेशातले हे पुरुष कोण? हा असेल आजच्या भागातील टास्क? (Video)
Bigg Boss Marathi 2 Day 3 Episode Preview (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 3 Episode Preview: बिग बॉस मराठी 2 च्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. तर आजचा बिग बॉसच्या घरातील तिसरा दिवस असून घरातील स्पर्धक हे एका वेगळ्याच अंदाजात दिसून येत आहेत. तर घरातील पुरुष स्पर्धकांनी बायकांचा वेश परिधान करुन चक्क लावणी आणि गाण्यांच्या ठेक्यावर थिरकताना दिसून येत आहेत. मात्र पुरुषांचा अशा पद्धतीचा वेश हा आजच्या भागातील टास्क असणार का? हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

कलर्स मराठीवर सध्या रात्री 9.30 वाजता बिग बॉस मराठी 2 च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. तर कलर्स मराठीने नुकताच बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये पुरुष स्पर्धक हे बायकांचा वेशात दिसून येत आहेत. मात्र बायकांच्या वेश परिधान करत नृत्य करणे हा आजच्या भागचा टास्क असणार आहे का हे पाहणे उत्सुकचे ठरणार आहे.

तर आजच्या भागात स्पर्धक सुरेखा पुणेकर या विद्याधर जोशी यांच्यासोबत प्रसिद्ध लावणी 'या भावोजीवर, तुम्ही बसा भावोजी'वर ठेका धरताना दिसून येत आहेत. त्यानंतर किशोरी शहाणे आणि अभिजित केळकर मराठी मधील गाजलेला चित्रपट 'अशी ही बनवा बनवी'च्या टायटल सॉन्गवर थिरकताना दिसून येत आहेत. त्याचसोबत बिग बॉसच्या घरातील अन्य स्पर्धक सुद्धा अशाच पद्धतीचा बायकी वेश परिधान करुन प्रेक्षकांचे आज मनोरंजन करताना दिसून येणार आहेत.(Bigg Boss Marathi 2 Day 3 Episode Preview नॉमिनेशनपासून बचावण्यासाठी बिग बॉसच्या घरात आज 'इमोशन्स'चा खेळ)

Colors Marathi Tweet: 

मात्र बिग बॉसच्या घरातील दुसऱ्या दिवशी स्पर्धकांमध्ये वाद झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. तर आता या 100 दिवसांच्या खेळामध्ये आपली वर्णी लावण्यासाठी प्रत्येक स्पर्धक आपली कोणती स्ट्रॅटेजी वापरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच सध्या बिग बॉसच्या घरातील अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले या दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन ठिगणी उडत असल्याचे गेल्या दोन दिवसात दिसून आले आहे.