BBM2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 च्या घरात आजही 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार्य कायम राहणार आहे. अद्याप लव्हगुरू पराग कान्हेरे यांचा तास होणं बाकी आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तापलेल्या घरात आज रूपाली आणि पराग, शिव आणि वीणा तर सुरेखा पुणेकर आणि बाप्पा जोशी यांच्यामुळे वातावरण थोडं हलकं होणार आहे. काल (12 जून) च्या एपिसोडमध्ये घर सोडून जाण्याच्या शिवानी सुर्वेच्या हट्टाचं पुढे काय होणार? याबाबतही रसिकांना उत्सुकता आहे. आत्तापर्यंत बिग बॉस मराठी 2 च्या घरात काय झालंय? 

शिवानी सुर्वेला पुन्हा राग अनावर

शाळा सुटली पाटी फुटली या कार्यात नापास केल्यावरून शिवानी पुन्हा घरातील इतर सदस्यांवर आगपाखड करणार आहे. त्याची झलक शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमधून पहायला मिळाली आहे.

साप्ताहिक कार्यात आता दुसरी टीम शिक्षकाच्या भूमिकेत

साप्ताहिक कार्यादरम्यान शिक्षक असलेले आता विद्यार्थी होतील तर विद्यार्थी असलेले स्पर्धक शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी नापास करताना तो स्पर्धक म्हणूनही कॅप्टनसीच्या शर्यतीमधून बाहेर टाकायचा आहे. त्यामुळे घरात काही वाद रंगण्याचीदेखील शक्यता आहे.