Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 च्या घरामध्ये सध्या 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. कॅप्टन निवडीसाठी सुरू असलेल्या या टास्कमध्ये सध्या सारेच स्पर्धक पुन्हा बालपण अभुभवत आहेत. दोन गटात विभागल्या गेलेल्या घरात आज 'इंग्रजी', 'संगीत', 'प्रेमशास्त्र' याचे तास रंगणार आहेत. बिग बॉसच्या घरातील 'रोमियो' पराग कान्हेरे 'लव्हगुरू'च्या रूपात दिसणार आहे. घरात रूपाली आणि परागच्या प्रेमकहाणीची चर्चा रंगत आहे. आज प्रेमशास्त्राच्या तासाला ती अधिकच बहरून रसिकांसमोर येण्याची शक्यता आहे. पहा आत्तापर्यंत बिग बॉस मराठी 2 च्या घरात काय काय झालंय? 

बिचुकले यांचं मजेशीर इंग्रजी 

नृत्याचा तास घेणार्‍या सुरेखा पुणेकरांच्या तासाला बाप्पा काय धम्माल करणार? तर वीणा आणि शिवमध्ये काय घडणार? हे पाहणं आज उत्सुकतेचं ठरणार आहे.

लव्हगुरू पराग 

 

हसता हसता पुढे वैशाली माडेच्या संगीताच्या वर्गामध्ये 'इक प्यार का नगमा' गाण्यावर सार्‍यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावतात.

 

वैशालीचं गाणं 

प्रेम, राग वादयामधून वाटा काढून पुढे सरकणारा बिग बॉसच्या घरातील खेळ यंदा कुणाला कॅप्तन बनणार हे पाहणंदेखील तितकंच उत्कंठावर्धक होऊन बसलं आहे. या आठवड्यात बाप्पा आपलं सिक्रेट कार्य कसं करतोय?हे देखील पहायचं आहे. कालच्या (11 जून) आठवड्यात नेहा आणि अभिजित बिचुकले हे दोन स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत.