Bigg Boss Marathi 2 Day 16 Episode Preview: बिग बॉस सुनावणार आज घरातील सार्‍याच सदस्यांना कठोर शिक्षा (Watch Video)
Bigg Boss Marathi 2 (Photo credits: Twitter)

बिग बॉसच्या घरात आजपासून तिसर्‍या आठवड्याला सुरूवात होत आहे. मैथिली जावकर (Maithili Jawkar) ही बिग बॉस मराठी 2 च्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. त्यानंतर आज पुन्हा घरात राहण्यास अपात्र वाटणार्‍या सदस्यांच्या नॉमिनेशन प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. Bigg Boss Marathi 2, First Week Elimination: मैथिली जावकर बिग बॉस मराठी 2 च्या घरातून बेघर

मागील 15 दिवसातील बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं वागणं, वारंवार नियम भंग करणं यामुळे यंदा इम्युनिटी टास्क न देता बिग बॉस सार्‍यांनाच शिक्षेला पात्र ठरवतो. यंदाच्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया ही 'बिग बॉस मिठाईवाला' टास्कमधून पार पडणार आहे. त्यानुसार, नॉमिनेट करणार्‍या सदस्याच्या नावाची मिठाई आता स्पर्धकांना उकळत्या तेलात तळून आपला राग व्यक्त करायचा आहे. त्यानुसार आता तिसर्‍या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

Colors Marathi Tweet

शिव आणि माधवमध्ये वाद

जसजसा खेळ रंगत आहे तशी भांडणं, वाद , हेवेदावे पुढे यायला सुरूवात झाली आहे. आजच्या भगात दोन 4 विरूद्ध 10 अशा दोन गटात विभागलेल्या बिग बॉस हाऊसमध्ये शिव एका गटाकडून मिळालेली माहिती रूपाली, वीणा, पराग आणि किशोरी या चार सदस्यांच्या गटाला पोहचवत असल्याच्या गोष्टीवरून शिव आणि माधव मध्ये राडा होनार असं चित्र आहे.