बिग बॉस मराठी 2 च्या पर्वातील आज शेवटचा विकेंडचा डाव आहे. तर सुरुवातीलाच महेश मांजरेकर यांनी शिवानी आणि नेहाच्या गेल्या काही दिवसांपासून घरातील वागणुकीबद्दल त्यांची कानउघडणी करतात. त्यानंतर पुन्हा घरातील वातावरण आनंदाचे होते. तसेच महेश मांजरेकर घरातील सदस्यांना 20 वर्षानंतर तुम्हाला बिग बॉसच्या घरात कोणासोबत यायला आवडेल याचे फोटोंच्या माध्यमातून सांगायचे असा टास्क देऊ करतात. यामध्ये नेहा हिला शिवानी, शिव याला वीणा, तर वीणा शिव सोबत, बिचुकले यांना किशोरी हिच्यासोबत तर पुन्हा किशोरी यांना बिचुकले सोबत, शिवानी हिला नेहा सोबत आणि आरोह याला स्वत: सोबतच या घरात यायला आवडेल असे फोटोच्या माध्यमातून दाखवले जाते.
घरातील सदस्यांकडे आता फक्त 7 दिवस राहिले असून सर्वांनी या दिवसांत आनंदाने रहा असे महेश मांजरेकर सांगतात. त्यानंतर बिचुकले आणि शिवानी तोफा तोफा लाया लाया या गाण्यावर थिरकताना दिसून येतात. बिचुकले यांच्या या थिरकण्याला महेश सर शेतकरी स्टाइल असे नाव देत त्यांचे कौतुक करतात. शिव आणि नेहा लुंगी डान्स या गाण्यावर नाचताना दिसून येतात. मात्र त्यानंतर सदस्यांच्या समोर गोल्ड पाटी ठेवण्यात येते. परंतु ज्या सदस्याचे नाव गोल्ड पाटीवर नसणार तो सदस्य आज घरातून बाहेर पडणार आहेत. फिनालीसाठी तिकिट मिळालेल्या नेहा आणि शिवानी या दोघींना गोल्ड पाटी मिळतेच.(Bigg Boss Marathi 2, Episode 92 Preview: बिग बॉस मराठी 2 ची अंतिम फेरी गाठणारे स्पर्धक आज ठरणार)
तर शिव हा बिग बॉस सीजन 2 च्या फायनलिस्टमधील तिसरा सदस्य ठरला आहे. आरोह आणि वीणा यांना गोल्ड पाटी मिळते. मात्र किशोरी यांना गोल्ड पाटी न मिळणार नाही याचा वाईट वाटते. पण बिग बॉस तिला गोल्ड पाटी देत सरप्राईज दिल्याने किशोरी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून येतात. त्यामुळे आता अभिजित बिचुकले सोडून घरातील अन्य सर्व सदस्य फिनालेमध्ये पोहचले आहेत. मात्र अभिजित बिचुकले हे घरातून जाणार की नाही या निकाल बिग बॉस उद्या जाहीर करणार असल्याचे एपिसोडच्या शेवटी सांगण्यात आले. त्यामुळे बिचुकले यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.