Bigg Boss Marathi 2, 7th June 2019, Day 11 Episode 12 Updates: बिग बॉसच्या निर्णयामुळे स्पर्धकांमध्ये भुकंप; शिवानी सुर्वे आणि विना जगताप यांना बिग बॉसची शिक्षा
Bigg Boss Marathi 2 | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 7th June 2019, Day 11 Episode 12 Updates:  चोर बाजार टास्कमध्ये घडलेल्या मारहाणीची बिग बॉसने गंभीर दखल घेतली. ही मारहाण अगदीच किरकोळ स्वरुपाची असली तरी बिग बॉस च्या घरात कोणत्याही स्वरुपात हिंसा अथवा मारहाण करणे बिग बॉसच्या नियमात बसत नाही. त्यामुळे या मारहाणीची दखल घेत बिग बॉसने वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांना अडगळीच्या खोलीत जाण्याची शिक्षा दिली. ही गंभीर शिक्षा आहे. सुरुवातीला असे वाटत होते की, गुन्हा करणारे दोन्ही स्पर्धक बहुदा घरातून बाहेर जातील. पण, सारासार विचार करत बिग बॉसने दोघींना अडगळीच्या खोलीत टाकण्याची काहीशी सौम्य शिक्षा ठोठावली.

दरम्यान, वीणा बिग बॉसचा आदेश प्रमाण मानत अडगळीच्या खोलीत गेली. मात्र, शिवानीने अडगळीच्या खोलीत जाण्याच्या आदेशाचे पलन न करता  आज्ञाभंग केला. त्यामुळे शिवानी ही जर शिक्षा भोगण्यास तयार नसेल तर घरातील सर्वच सदस्यांना शिक्षा दिली जाईल, असा निर्वाणीचा इशारा बिग बॉसने दिला. बिग बॉसचा सर्वानाच शिक्षा होईल हा निर्णय पाहून बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये भुकंप झाला. त्यामुळे आपल्यामुळे सर्वांना त्रास नको म्हणून शिवानी अडगळीच्या खोलीत जायला तयार झाली. मात्र, त्यात मी अडगळीच्या खोलीत जाऊन तुमच्यावर उपकार करते हाच रुबाब अधिक होता. हा रुबाब मैथिली वगळता इतर सदस्यांनी खपवून घेतला हे विशेष. इथे केवळ तू जर आमच्यासाठी अडगळीच्या खोलीत जाणार असशील तर तसं करु नको. तुला वाटत असेल तरच तर तू अडगळीच्या खोलीत जा, असे मैथिलीने ठणकाऊन सांगितले.

बिचुकले झाले न्यायाधीश

दरम्यान, बिग बॉसने अभिजित बिचुकले यांना न्यायाधीशाची भूमिका दिली आहे. शिवानी आणि वीणा यांचा खटाल बिचुकले यांच्या कोर्टात सुरु आहे. न्यायाधीशांनी दोन्हीकडील बाजू ऐकूण घेतल्या आहेत. पाहूयात काय निर्णय येतो. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर बिचकूले यांना दोन्ही पैकी एका आरोपीस निर्दोश आणि एका आरोपीस दोषी ठरवायचे आहे. त्यानंतर बिग बॉसने पाकीटात ठेवलेल्या पत्रात उल्लेख असलेली शिक्षा दोषी आरोपीस द्यायची आहे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2: आपण कोणाला फुटेज देत नाही,अवघा महाराष्ट्र मला पाहतोय: अभिजित बिचुकले)

बिग बॉस, या टकल्याला बाहेर काढा!

बिग बॉसच्या घरात किचन आणि जेवण हा चांगलाच वादाचा मुद्दा बनला आहे. कोणी, कुणासाठी, किती आणि काय जेवण बनवायचा हा खरा वादाचा मुद्दा. यात पराग कान्हेरे याने तोडगा सुचवला की, आम्ही वेगळा स्वयंपाक बनवतो. यावर सुरेखा पुणेकर भलत्याच चिडल्या. त्यांनी तर पराग याला उद्देशून  बिग बॉसकडे सरळ आव्हानच केलं की, 'बिग बॉस या टकल्याला बाहेरच काढा' आता पाहूयात बिग बॉस काय करतायत.

'पराग मला माफ कर', शिवानीला झाली उपरती

रात्री अडीच वाजता शिवानीला उपरती झाली आणि तिने परागला सॉरी म्हटलं. का तर, चोरबाजार टास्कमध्ये परवा शिवानीने पराग कान्हेरे याच्यावर हात उगारला होता. यावरुन पराग कान्हेरे याने चोरबाजार टास्कमध्ये सहभागी व्हायला नकार दिला होता. नंतर तो टास्कमध्ये सहभागी झाला. पण, हा टास्क संपल्यानंतर शिवानीने परागला म्हटलं की, 'मला माफ कर. तुझ्यावर हात उगारणे वैगेरे माझी स्ट्रॅटीजी होती.' अर्थात, पराग यानेही तिला माफ केले. पण, हे खरोखरचं माफ होतं. त्याची स्ट्रॅटीजी हे अद्याप कळायचं आहे.