Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) हे अनाकलनीय प्रकरण आहे. कधी काय बोलेन आणि कोणाची विकेट घेऊन, किंवा त्याच बोलण्यामुळे कधी समोरच्या व्यक्तिच्या मनात गोंधळ निर्माण होऊन वाद सुरु होईन हे अजिबाद सांगता येत नाही. बरं, त्यात गंमत अशी की, अभिजित महोदयांचे बोलण्याचे टायमिंग आणि बोलताना त्यांनी तयार केलेली पार्श्वभूमी हे फारच मजेशीर असते. इतके की, अभिजित बिचकुले यांनी मोठ्या आत्मविश्वासाने मारलेला डायलॉग ऐकून समोरचा अनेकदा गर्भगळीत होतो. कालच्या भागातही असेच घडले. अभिजित बिचुकले यांनी मारलेला डॉयलॉग ऐकून दिगंबर नाईक (Digambar Naik), शिवानी सुर्वे (Shivani Surve) गर्भगळीत झाले. खरोखरच अभिजित यांच्या आत्मविश्वासाला दादच द्यायला पाहिजे. काय घडले असे घ्या जाणून.
त्याचे असे झाले अभिजित बिचुकले, दिगंबर नाईक आणि शिवानी सुर्वे हे एकत्र बसलेले. त्यांच्या छान गप्पा चाललेल्या. त्यात दिगंबर आणि शिवानी हे पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले यांच्याबाबत गॉसीप करत होते. पण, त्यांच्या बोलण्यााचा थेट उलघडा अभिजित बिचुकले यांना होत नव्हता. त्यामुळे तुम्ही कोणाबद्दल बोलताय असं अभिजित बिचुकले यांनी विचारले. योगायोगाने रुपाली आणि अभिजित पाठीमागे बसले होते. जे काचेतून स्पष्ट दिसत होते. त्यानंतर त्यांच्या झालेला संवाद साधारण असा..
अभिजित बिचुकले: तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
शिवानी आणि दिगंबर: तेच ते पराग आणि रुपाली!
अभिजित बिचुकले: कोण तो शाकाल? (पराग कान्हेरे यांचा टक्कल आहे)
शिवानी आणि दिगंबर: (अंगुलीनिर्देश करत) ते बघ दोघं पाठीमागेच बसले आहेत.
अभिजित बिचुकले: छे.. छे.. आपण मागे बगत नसतो.
शिवानी आणि दिगंबर: (प्रश्नार्थक मुद्रेने) का?
अभिजित बिचुकले: का म्हणजे काय? आपण कोणाला फुटेज देत नाही. आता कॅमेरा माझ्याकडे आहे. आणि अवघा महाराष्ट्र मला पाहतोय. मी जर मागे वळून पाहिले तर, महाराष्ट्र, मीडिया काय म्हणेल. अभिजित बिचुकले यांनी त्या दोघांकडे मागे वळून पाहिले. कसं दिसेल ते?
अभिजित बिचुकले यांनीआत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला हा डायलॉग ज्या पद्धतीने आणि ज्या पार्श्वभूमीवर फेकला तो पाहून शिवानी सुर्वे आणि दिगंबर नाईक एक क्षण इतके आश्चर्यचकीत झाले की, ज्याला गर्भगळीत असेच म्हणावे लागेल. त्यांना अभिजितला काय बोलावे हे क्षणभर सुचलेच नाही. बिचुकलेंची त्यावेळची भावमुद्रा आणि अवतार, देहबोली पाहून शिवानी आणि दिगंबर नाईक हे त्यानंतर जे हसत सुटले ते बराच वेळ लोटपोट झाले तरी थांबलेच नाहीत. बाकी काही असले तरी, 'आपण कोणाला फुटेज देत नाही. आता कॅमेरा माझ्याकडे आहे. आणि अवघा महाराष्ट्र मला पाहतोय' हे वाक्य सातारी भाषेत ऐकावे ते अभिजित बिचुकले यांच्याकडूनच.