Bigg Boss Marathi 2, 4 July, Episode 40 Updates: बिग बॉसच्या घरात पाहुणे, स्पर्धकांना झालंय 'अतिथी तुम कब जाओगे?'

Bigg Boss Marathi 2, 4 July, Episode 40 Updates: बिग बॉसच्या घरात आलेल्या पुष्कर जोग (Pushkar Jog), सई लोकूर (Sai Lokur), स्मिता गोंदकर (Smita Gondkar) आणि शर्मिष्ठा राऊत ( Sharmishtha Raut) या पाहूण्यांनी घरातील स्पर्धकांना चांगलेच धारेवर धरले. घरातील स्पर्धकांना पाहुण्यांनी ठरवून संभ्रमीत केले. यात वीणा जगताप आणि नेहा शितोळे निशाण्यावर होत्या. विणाला संभ्रमीत करण्यासाठी पाहुण्यांनी ठरवून भांडण केले. त्यासाठी वीणा हिला कांदा कापत आणि पोहो भिजवत शिवसोबत किचनमध्ये डान्स करायला लावला.

पाहूण्यांना खूश करण्यासाठी टीम बी ने गायलं रॅप

डीग डीग टाक... डीग डीग टाक...

बिग बॉसच्या घरात तुम्हाला एक वर्षांनी पाहून

आम्हालाही झालाय फार आनंद

डीग डीग टाक... डीग डीग टाक...

आम्ही तुमचे करणार जोरदार स्वागत बिग बॉसच्या घरात

आणि तुमच्याुमळे आम्हालाही कळलं आमचं कुठं चुकतंय

आम्हाला तुमच्यामुळे सुचला एक मस्त रॅप

डीग डीग टाक... डीग डीग टाक...

डीग डीग टाक... डीग डीग टाक...

टीम बी ने केलेलं त्यांना सर्व काही आवडू दे

घरातून बाहेर जाताना आमच्या सोबतच्या खूप खूप आठवणी बाहेर न्या..

डीग डीग टाक... डीग डीग टाक...

चष्मा शोधण्याठी शिव उतरला स्विमींग पूलमध्ये..

शर्मीष्ठा राऊत हिने जाणीवपूर्वक आपला चष्मा स्विमींग पूलमध्ये टाकला. आणि तो पडल्याचा कांगावा केला. त्यानंतर हा चष्मा शोधून देण्यासाठी टीम ए आणि टीम बी मधील सदस्यांना कामाला लावले. हा चष्मा शोधण्यासाठी अभिजित केळकर आणि शिव ठाकरे पाण्यात उतरले. अखेर शिव ठाकरे याला हा चष्मा सापडला. (हेही वाचा, बिग बॉसच्या घरात पाहुणे पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत यांनी स्पर्धकांना नाचवले)

नेहाच्या सूपमध्ये शर्मिष्ठाचा केस

नेहाला संभ्रमीत करण्यासाठी शर्मिष्ठा, सई आणि स्मिता यांनी ठरवून एक युक्ती केली. नेहाने शर्मिष्ठाला आणून दिलेल्या सूपमध्ये घरातील स्पर्धक आणि खास करुन नेहाचा डोळा चुकवून डोक्याचा केस तोडून जाणीवपूर्वक टाकला. त्यामुळे नेहमा संभ्रमीत झाली. पण, तिची टीमही फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली.