बिग बॉसच्या घरातून रविवारी माधव हा घराबाहेर गेला आहे. त्यामुळे नेहा हिला अत्यंत वाईट वाटले असून त्याची कमतरता तिला भासत आहे. यामुळेच नेहा आणि शिवानी या दोघींच्या डोळ्यात पाणी दिसून आले. तर अभिजित बिचुकले यांची घरात पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने त्यांची मैत्रीण शिवानी हिला फार आनंद झाला असल्याचे दिसले. घरातील सर्व सदस्यांनी बिचुकले यांच्या येण्याने आनंद व्यक्त करत त्यांचे स्वागत केले. तसेच घराचा नवा नियम म्हणून बिचुकले यांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणार असल्याची त्यांची मस्करी केली जाते. पण बिग बॉसने बिचुकले यांना घरात पाहुणे म्हणून घोषित केले आहे.
तर शिव याच्यावर भांडी घासण्याची जबाबदारी दिली असून या मुद्द्यावरुन त्याची घरातील सदस्यांसोबत भांडण झाले. परंतु या भांडणात वीणा हिने सुद्धा उडी घेतल्याने नेहाकडून तिच्यावर टीका करण्यात आली. तर किशोरी ताई यांनी या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचे वाद सुरुच होते.याच कारणावरुन पुन्हा वीणा आणि रुपाली यांच्यामध्ये सुद्धा वाद होत घरात कलह झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. (Bigg Boss Marathi 2, 29 July, Episode 65 Preview: बिग बॉसच्या घरात आज होणार अभिजित बिचुकले यांची पुन्हा एन्ट्री (Watch Video)
बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक टास्क देत त्यामध्ये विविध कामाअंतर्गत टॉप 2 आणि बॉटम 2 कोण असणार हे ठरवायचे असणार आहे. दरम्यान हिनाने तिचे मत मांडत टॉप 2 मध्ये शिवानी नसावी असे म्हटले. तर शिवानी हिने सुद्धा हिनावर राग व्यक्त करत दुसऱ्यांसोबत कसे वागायचे आणि नाही हे मला सांगू नकोस असे सांगत तिची कानउघडणी केली. घरातील सर्व सदस्यांच्या मते टॉप 2 मध्ये अभिजित केळकर असल्याचे सांगितले पण दुसऱ्या सदस्याचे नाव सांगता आले नाही. तसेच बॉटम 2 साठी सुद्धा कोणाचे नाव घोषित करण्यात आले नाही. मात्र बिग बॉसकडून आरोह आणि अभिजित या आठवड्याच्या कप्तानपदासाठी निवड झाली आहे. तर बिग बॉसकडून उद्याच्या भागात देण्यात येणाऱ्या टास्क दरम्यान बळाचा वापर करत सदस्यांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाल्याचे दिसून येणार आहे.