बिग बॉस मराठी 2 च्या घरात शिवानी सुर्वे, हीना पांचाळ नंतर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून अभिजीत बिचुकले यांची दमदार एन्ट्री होणार आहे. यंदाच्या विकेंडचा डाव मध्ये माधव देवचके घरातून बाहेर पडल्यानंतर आज (29 जुलै) च्या भागात अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) घरात एन्ट्री घेणार आहेत. कायदेशीर कारवाईमध्ये अडकलेल्या अभिजीत बिचकुलेंना महिनाभरापूर्वी बिग बॉसच्याच घरातून अटक करण्यात आली होती. मात्र आता जामीन मंजूर झालेल्या अभिजीत बिचुकलेंचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. आज दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहेत. पहा काय होणार आजच्या भागात?
अभिजीत बिचुकलेंच्या एंट्रीप्र्माणेच शिवानी, नेहा, माधव हे त्रिकूट माधवच्या एक्झिटमुळे तुटले आहे. दरम्यान मागील आठवड्यात नेहा आणि शिवानीमध्ये झालेला वाद मिटवून दोघी पुन्हा एकत्र येणार असल्याची कबुली देखील देत आहेत. शिवानी आणि नेहा या बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच एकत्र होत्या मात्र जसजसा खेळ पुढे जात आहे तशी स्पर्धा तीव्र होत आहे. परिणामी एकमेकांविरूद्ध घरात असुरक्षिततेची भावना वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ग्रुपिझम मोडून प्रत्येकालाच खेळावं लागणार आहे. Bigg Boss Marathi 2, 28 July, Episode 64 Updates: शिवानी आणि वीणामध्ये शीतयुद्ध; माधव देवचके या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर
बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेंची एन्ट्री
#BiggBossMarathi2 च्या घरात कोण घेतय Entry?
पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. #AbhijitBichukale @imsurveshivani @GmKishori @bhosle_rupali @TheHeenaPanchal @abhijeetkellkar @shivthakare_ @ArohWelankar pic.twitter.com/Aio86cI5iu
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 29, 2019
बिग बॉस मराठीच्या घरात महेश मांजरेकरांनी दिलेल्या 'कानउघडणी'च्या कार्यामध्ये खास कामगिरी करणार्या सदस्याला परफ्युम गिफ्ट म्हणून मिळणार आहे. त्यामुळे आता तो सदस्य कोण असेल याची चर्चा वीणा आणि शिवमध्ये रंगणार आहे.