Bigg Boss Marathi 2, 11 July, Episode 47 Updates: बिग बॉसचे टास्क फक्त नावापुरतेच, खेळण्याऐवजी सदस्य करत आहेत Match Fixing
Bigg Boss Marathi 2, 11 July, Episode 47 (Photo Credit : Colors Marathi)

कालच्या भागात बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यामध्ये 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत, मात्र या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार नाही. यामुळे व्होटिंग लाईन्सदेखील बंद असणार आहेत. आजच्या भागाची सुरुवात नेहा आणि हीनाच्या चर्चेने होते. नेहा, हीनाला समजावते की तिने शिवला का सेफ केले. यावर हीना तिचे प्रेम लपवत उत्तरे देण्याचा प्रेम करते. दुसरीकडे तिचे घरातल्या सदस्यांशी भाकरी बनवण्यावरून भांडण सुरु होते.

हीनाला भाकरी हवी असते मात्र घरात कमी सामान असल्याने, वीणा व इतर सदस्य तिला भाकरी बनवू देत नाहीत, यावर घरात गोंधळ सुरु होतो. ‘जर का मला भाकरी बनवू दिली नाही तर मी आज जेवणार नाही’ अशी धमकी हीना देते. हीनाला सर्वजण समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र हीना आपल्या मतावर ठाम राहते. घरात अवघ्या भाकरीच्या पीठावरून अक्षरशः बैठक बसून चर्चा होते, हीनाला भाकरी खायची आहे तिला ती खाऊ न देणाऱ्या माणसांची कोत्या मनाची वृत्ती इथे दिसून येते. ही चर्चा पुन्हा भांडणात परावर्तीत होते आणि त्यावर सर्वजण आपली मते मांडतात. (हेही वाचा: आपल्या एकतर्फी प्रेमाखातर हीनाने घेतला मोठा निर्णय; या आठवड्यासाठी तब्बल 7 सदस्य झाले नॉमिनेट)

अखेर किशोरी हीनाला सपोर्ट करत आहे, तिचा ब्रेन वॉश करत आहे हे पाहून वीणा किशोरीचा अपमानास्पद उल्लेख करते. हे पाहून पहिल्यांदाच किशोरी उद्धट वीणावर प्रचंड चिडते. तिला चार खडे बोल सुनावून, एकटी रूममध्ये येऊन आपला राग व्यक्त करते. वीणा आणि रुपालीपासून वेगळे झाल्यावर किशोरी हीनाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर परत एकदा वीणा आणि शिव पुराण सुरु होते. वीणाला शिव आवडू लागला असल्याचे ती मान्य करते. इथून बाहेर पडल्यावर सर्वकाही व्यवस्थित झाल्यावर शिवसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडेल असे ती रूपालीला सांगते.

त्यानंतर बिग बॉसकडून ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य देण्यात येते. यांमध्ये भूत झालेल्या सदस्यांना टास्कमध्ये जिंकणे आवश्यक आहे, जे लोक जिंकतील ते कप्तानपदासाठी पात्र ठरतील पहिल्या फेरीसाठी टीम B म्हणजे, वीणा, शिव, वैशाली आणि अभिजित भूत असणार आहेत. इथे टीम A नी लपवलेल्या टीम B च्या बाहुल्या शोधून तिला सुरक्षितरित्या सेफ झोन मध्ये घेऊन येऊन यायचे आहे. यावेळी शिवसोबत परत एकदा नेहा डील करते, नेहाने शिवला त्याची बाहुली कुठे आहे हे सांगितले आहे, तीच गोष्ट रुपाली करते. अशाप्रकारे खेळण्याआधीच दोन्ही बाजूचे खेळाडू फिक्सिंग करतात त्यामुळे बिग बॉस चे टास्क पाहण्यातली मजा गेली आहे. शेवटी वीणा, अभिजित आणि शिव सेफ होतात.