OTT वर सलमान खान नव्हे तर 'हा' सेलिब्रिटी करणार Bigg Boss-15 सीझनचे सुत्रसंचालन
Bigg Boss (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Season 15: टेलिव्हिजन जगतातील सर्वाधिक मोठा रिअॅलिटी शो बिग बॉस लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच ईदच्या दिवशी शो चा पहिला प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान, शो च्या प्रीमियरमध्ये काही बदल करण्यात आल्याचे दिसून येणार आहे. खरंतर पहिल्यांदाच बिग बॉसचे टेलिव्हिजन ऐवजी ओटीटीवर प्रिमियर होणार आहे. अशातच अशी जोरदार चर्चा सुरु आहे की, यंदाचा बिग बॉस-15 सीझन हा सहा आठवड्यांसाठी असणार आहे. तर मुख्य बाब म्हणजे हा शो सलमान खान नव्हे तर बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक करण जौहर सुत्रसंचालन करणार आहे.

स्पॉटबॉयच्या रिपोर्ट्सनुसार करण जौहर डिजिटल स्पेससाठी सलमान खान याच्या रिअॅलिटी शो चे सुत्रसंचालन करणार आहे. VOOT नुकत्याच बिग बॉसच्या ओटीटी प्रीमियरची घोषणा केली आहे. शो च्या पहिल्या सहा आठवड्यातील एपिसोड हे थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. खासियत अशी की, प्रेक्षकांना शो 24X7 पाहता येणार आहे. निर्मात्यांकडून ही घोषणा करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये खुप उत्साह दिसून येत आहे. सलमान खान याने नुकताच बिग बॉस 15 च्या सीझनचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला होता. ज्यामध्ये सलमान खान हसत प्रेक्षकांना सुचना देत असल्याचे दिसून आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान, यंदाचा बिग बॉसचा सीझन अधिक धमाकेदार, मनोरंजनात्मक असणार आहे. ऐवढेच नव्हे तर यंदाच्या सीझनमध्ये कोणकोण कन्टेटंट सहभागी होणार याची सुद्धा आता प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे.