बिग बॉस 13 च्या प्रक्षेपण वेळेत बदल, Colors वरील 'या' दोन मालिका बंद होणार?
Bigg Boss Season 13 | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

हिंदी मधील बिग बॉस (Bigg Boss) या बहुचर्चित रिऍलिटी शो चे 13 वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. यंदाच्या नव्या सीझनसाठी कोणते सेलिब्रिटी स्पर्धक बिग बॉसच्या घराचे सदस्य बनणार यापासून ते सलमान खान (Salman Khan) या वर्षी सूत्रसंचालनसाठी किती कोटी मानधन घेणार इथपर्यंत प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगत आहेत, अशातच या शो बद्दलची एक नवी माहिती हाती येत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, बिग बॉस 13 चे मेकर्स शोच्या प्रक्षेपणाची वेळ एक तास पुढे ढकलण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या सीझनला 9  वाजता सुरु होणाऱ्या बिग बॉसच्या प्रक्षेपणासाठी यंदा प्रेक्षकांना 10 वाजेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. एकीकडे, एन प्राईम टाईमची वेळ पुढे ढकलल्याने शोच्या टीआरपी (TRP) वर परिणाम होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे यावेळेत कलर्स वर दाखवण्यात येणाऱ्या अन्य दोन मालिकांचे काय होणार असाही प्रश्न समोर येत आहे.

IB टाइम्स च्या सूत्रानुसार, कलर्स वर 10 ते 11 या वेळेत बेपनाह प्यार आणि विश या मालिका दाखवल्या जातात, या दोन्ही मालिका अगदी अलीकडेच सुरु झाल्या आहेत, मात्र दोन्ही मालिकांना हवा तसा टीआरपी मिळत नसल्याने या मालिका बंद करून 10 ते 11 चा स्लॉट बिग बॉसला उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. अन्यथा या दोन मालिकांची वेळ बदलणे हा एक पर्याय सुद्धा निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास वाहिनी अथवा शोच्या निर्मात्यांकडून या शक्यतांची पुष्टी करण्यात आलेली नाही. BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून

दरम्यान, सध्या बिग बॉस 13 या पर्वासाठी टीव्ही व सिनेमातील अनेक बड्या कलाकारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये चंकी पांडे घरात सदस्य म्ह्णून दिसून येईल अशीही चर्चा मध्यंतरी होत होती. याशिवाय, माही विज, जय भानुशाली, विवेक दहिया या छोट्या पडद्यावरील कलाकारांना सुद्धा शोच्या निर्मात्यांकडून विचारण्यात आले होते.