Bigg Boss 13: बिग बॉस च्या घरात रश्मी देसाई ला हेअर लाईन फ्रॅक्चर; पाहा हा व्हिडिओ
Rashami Desai (Photo Credits: Facebook)

Rashami Desai Suffers Hairline Fracture in Bigg Boss 13: बिग बॉस 13 च्या आज रात्रीच्या भागात, सर्वच स्पर्धक लक्झरी बजेटच्या टास्कसाठी लढा देणार आहेत. पण या टास्कदरम्यान घडलेली दुर्दैवाची बाब म्हणजे रश्मी देसाईला झालेले हेयरलाइन फ्रॅक्चर. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसते की असीम इतर स्पर्धकांसमोर रश्मीला झालेल्या दुखापतीची बातमी सांगतो. मात्र शहनाज रश्मीबद्दल सहानुभूती दाखविण्यास अजिबात तयार नसून रश्मीचा हात फ्रॅक्चर होऊनही कसा काम करतोय असं विचारते.

प्रोमोमध्ये असंही दिसतंय की रश्मी अखेर अस्वस्थ होऊन तिचा माइक काढून ठेवते आणि तिला शो सोडायचा आहे असं बिग बॉस ना सांगते. पहा हा प्रोमो,

दुसर्‍या टीझरमध्ये लक्झरी बजेट टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक एकमेकांविरूद्ध कट रचत असल्याचे दिसून येते. गेम खेळत असताना ते एकमेकांवर चिडलेले दिसतात आणि टास्क दरम्यान विशाल आदित्य सिंग आणि माहिरा शर्मा यांच्यात भांडणाला सुरुवात होते.

इतकंच नव्हे तर शेफाली जरीवाला आणि शहनाज गिल या देखील वादात अडकतात. शहनाज मारल्याचे आरोप देखील शेफालीवर. परंतु, शेफाली असं काही करत नसल्याचे सांगते.

हे सर्व घडत असताना असिम रियाझ हिमांशी खुरानासमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि दोघेही काही रोमँटिक वेळ एकत्र घालवताना दिसतात.

दरम्यान, रश्मी देसाईला काही दिवसांपूर्वी रहाणं खानने रिंग देऊन सर्व घरच्यांसमोर प्रपोझ केलं होतं. परंतु रश्मीच्या घरी जाऊ देण्याच्या मागणीमुळे या दोघांच्या लव्ह स्टोरीचं भविष्य काय असेल हे येणार काळच ठरवेल.