Bigg Boss 12 Exclusive:मला बिग बॉसच्या घरात पाहून शिल्पा शिंदे आश्चर्यचकित,आनंदी होईल : मेघा धाडे, बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारा एंट्री
बिग बॉस 12च्या घरामध्ये मेघा धाडे वाईल्ड कार्डच्या स्वरूपात Photo Credit : File Photo

बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे आता बिग बॉस 12च्या घरामध्ये जाण्यास सज्ज झाली आहे. आजच्या भागामध्ये वाईल्ड कार्डच्या स्वरूपात मेघा धाडे सोबत हिंदी टेलिव्हिजनवरील चेहरा रोहित सुचंती प्रवेश करणार आहे. मेघा आणि रोहितच्या एंट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात आता नेमकं काय होणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठी विजेती मेघा धाडे

मेघा धाडेने मराठी बिग बॉसच्या घरात जेव्हा प्रवेश घेतला होता तेव्हा तिने रसिकांचं मन आणि ट्रॉफीदेखील जिंकली होती. पहिल्या दिवसापासून मेघा जिद्दीने खेळत होती. आता हिंदी बिग बॉसमध्ये पुन्हा मेघा काय करणार ? ही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

बिग बॉस 11ची विजेती शिल्पा शिंदे मेघाच्या पाठीशी उभी होती. त्यामुळे मेघाच्या फॅन्ससोबतच शिल्पाच्या फॅन ग्रुपचाही मतं मिळवण्यामध्ये मोठा फायदा झाला होता. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी मेघा धाडेने लेटेस्टीली बोलताना, " गेम शोच्या फॉरमॅटनुसार आपण बिग बॉस 12 च्या घरात जात असल्याचं कोणाला ठाऊक नाही. त्यामुळे शिल्पा शिंदेलाही याची माहिती नाही. पण लवकरच मला बिग बॉस 12 च्या घरात पाहून तिला आनंद होईल" असे मेघा धाडेने सांगितले आहे.

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डच्या स्वरूपात प्रवेश केल्यानंतर विजेतेपदापर्यंत स्पर्धक पोहचलेला नाही. त्यामुळे मेघा धाडे हा नवा इतिहास रचणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.