अभिनेत्री स्वत्तिका दत्ता सोबत उबर ड्रायव्हरची गैरवर्तवणूक; फेसबुक पोस्ट करत अभिनेत्रीने शेअर केला घडलेला प्रकार
Swastika Dutta (Image Credit: Facebook)

बंगाली अभिनेत्री स्वत्तिका दत्ता (Swastika Dutta) हिच्या सोबत एका उबर ड्रायव्हरने गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उबर ड्रायव्हरने (Uber Driver) मला रस्त्यात मध्येच उतरवल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. याप्रकरणी तिने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित उबर ड्रायव्हरला अटक केली आहे. जमशेद (Jamshed) असे या उबर ड्रायव्हरचे नाव आहे.

तिच्यासोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती तिने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले की, "सकाळी 8-15 वाजता घरुन स्टुडिओत जाण्यासाठी मी उबर बुक केली. मला पीक केल्यानंतर ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल करत मला अर्ध्या रस्त्यात उतरण्यास सांगितले. मी तसे करण्यास नकार दिल्यावर त्याने गाडी विरुद्ध दिशेने न्यायला सुरुवात केली. त्यानंतर मला अपशब्द वापरले. इतकंच नाही तर मला अर्ध्या रस्त्यात गाडीतून खेचून बाहेर काढत उतरवले."

"मी मदत मागण्यास सुरुवात करताच ड्रायव्हरने त्याने इतर मुलांना बोलावण्याची धमकी दिली. त्यावेळेस मला शूटिंगला जायचे आहे. संपूर्ण युनिट माझी वाट पाहत होतं. त्यामुळे मी निघाले. मात्र मी वडिलांकडून कायदेशीर कारवाईसाठी मदत मागितली."

स्वत्तिका दत्ता हिची फेसबुक पोस्ट:

स्वत्तिकाने ड्रायव्हरच्या फोटोसहित गाडीची नंबर प्लेट, ड्रायव्हरचा कॉन्टॅट नंबर आणि इतर माहिती देखील शेअर केली आहे.