कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात सर्वच क्षेत्रात आलेलं आर्थिक संकट पाहता आता मोठमोठ्या मंंडळींंना सुद्धा घर चालवण्यासाठी पडेल ते काम करावंं लागत आहे. अशीच वेळ बालिका वधु (Balika Vadhu), कुछ तो लोग कहेंगे (Kuchh To Log Kahenge) या व अन्य काही मालिकांंचे दिग्दर्शन केलेल्या रामवृक्ष गौर (Ram Briksh Gaur) यांंच्यावर आल्याचे कळतेय, रामवृक्ष हे आपल्या गावी उत्तर प्रदेशातील (UP) आझमगड (Azamgarh) येथे सायकल वरुन घरोघरी जात भाजी विकण्याचे काम करत आहेत. लॉकडाउन मुळे आपल्यावर ही वेळ आलीये पण आता जे शक्य आहे ते करणे गरजेचे आहे म्हणुन आपण हा मार्ग निवडल्याचे त्यांंनी स्वतः माध्यमांंना सांंगितले आहे.राम वृक्ष यांनी यशपाल शर्मा, मिलिंद गुणाजी, राजपाल यादव, रणदीप हूडा, सुनील शेट्टी यांच्या दिग्दर्शकांसह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. Siddharth Jadhav's Tweet: '2020 चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय' मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याची ट्विटरवर भावनिक पोस्ट
रामवृक्ष यांंनी सांंगितल्यानुसार ते एका भोजपुरी सिनेमाच्या कामानिमित्त आजमगडला गेले होते पण तितक्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि ते तिथेच अडकुन पडले. जो प्रोजेक्ट सुरु होता तो थांबवला होता आणि निर्मात्याने पुन्हा काम सुरु येण्यास आणखी एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रामवृक्ष यांंनी वडिलांचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि भाजीपाला विकायला सुरूवात केली. मी या व्यवसायाशी परिचित आहे आणि मला दु: ख नाही, असे त्यांंनी म्हंंटले आहे.
दरम्यान, रामवृक्ष यांंचे मुंबईत माझे स्वतःचे घर आहे. आपण या कोरोनानंंतर मुंंबईत परतणार आहोत आणि तेव्हा कामाला पुन्हा सुरुवात करु असा ठाम विश्वास त्यांंनी व्यक्त केला आहे. तोपर्यंत आपण आपले घर चालवण्यासाठी शक्य ते सगळे काही करत आहोत असे रामवृक्ष म्हणतात.