Arrest Warrant Against Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरच्या अडचणीमध्ये वाढ; न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी, जाणून घ्या कारण
एकता कपूर (Photo: Instagram)

निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) तिची वेब सीरिज XXX सीझन 2 मुळे अडचणीत सापडली आहे. बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृश्यांबाबत गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसराय न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी आता न्यायालयाने एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या पत्नीची अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती, ज्यासाठी एकता कपूरवर गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकतावर आरोप होता की तिने वेब सीरिजमध्ये सैनिक आणि त्यांच्या पत्नींना चुकीच्या पद्धतीने दर्शवले आहे, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स पाठवून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभूकुमार यांनी वर्षभरापूर्वी हा गुन्हा दाखल केला होता. शंभू कुमारने सांगितले की, या मालिकेत दाखवण्यात आलेल्या सीनमुळे ते खूप दुखावले आहेत. भारतीय सैनिक स्वतःला धोक्यात घालून देशाची सेवा करतात. अशा स्थितीत त्यांच्याकडे आदराने पाहिले पाहिजे, पण इथे उलटेच घडत आहे. मालिकेत भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. (हेही वाचा: Sreenath Bhasi Arrested: मुलाखतीदरम्यान अँकरला शिवीगाळ केल्याप्रकरणी मल्याळम अभिनेता श्रीनाथ भासीला अटक)

एकता कपूरने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. एकता कपूरने सांगितले की, तिला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने या वेब सीरिजमधून हा सीन काढून टाकला होता. यासोबतच एकताने आपली चूक मान्य करत लोकांची माफीही मागितली आहे. आता न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट जारी झाल्यानंतर एकता कपूर शोभा कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितले की, 524/C 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.XXX वेब सिरीज Alt Balaji वर प्रवाहित होत आहे.