Navratri 2020: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिची लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले 2' ने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. या मालिकेत तिने साकारलेली शेवंता आजही लोकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर अपूर्वा सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटोशूट नेहमीच चर्चेचा विषय असतात. मात्र अपूर्वाने नुकतेच नवरात्री निमित्त एक हटके फोटोशूट (Navratri Special Photoshoot) केले आहे. या फोटोमध्ये तिने देवीचा अवतार धारण करून खास फोटो काढले आहे. या फोटोंच्या माध्यमातून देवीच्या रुपातील महिलेची वेगवेगळी रुपे दाखवली आहेत.
या फोटोशूटमध्ये अपूर्वा ने पांढ-या रंगाची साडी नेसून नारीशक्तीचे रुप धारण केले आहे. यात महिला पोलिसांसोबत, लहान मुलाला गाडीवर घेऊन जाताना असे वेगवेगळे फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटचा एक व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. ज्याला 'प्रत्येक महिला ही एक देवीच आहे. जिने दुस-यासाठी केवळ त्याग आणि त्यागच केले आहेत.' असे कॅप्शन दिले आहे.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांनी प्रचंड पसंत केले असून लाईक्स आणि कमेंट्समधून ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.