नवरात्र उत्सवातील नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. याच आधारावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने कोविड-19 (Covid-19) संकटात समाजासाठी झटणाऱ्या कोरोना योद्धा देवीच्या रुपात साकारले आहेत. दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित नवरात्री निमित्त देवीची नऊ रुप साकारत फोटो शेअर करत असते. मात्र यंदा कोरोना संकटात तिला कोरोना योद्धांना देवीच्या रुपात दर्शवले आहे. आज नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तेजस्विनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी तत्पर असलेल्या पोलिसांना सलाम केला आहे.
तेजस्विनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, त्यात ती पोलिसांच्या वेशात दिसत आहे. पण भाळी लाल कुंकवाचा मळवट, नाकात नथ आणि कानात झुमके दिसत आहेत. आणि ती एका वृद्ध महिलेला मदत करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तेजस्विनीने लिहिले, "द्वितीया..सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती. तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती. सदैव तुझ्या साठी...." (Navratri निमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने धारण केला PPE किट मागे दडलेल्या नवदुर्गेचा अवतार, महिला डॉक्टरांना दिली देवीची उपमा, Watch Photo)
पहा व्हिडिओ:
नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिस यंत्रणेवरील भार कोरोना संकटकाळात अधिकच वाढला. या कठीण काळात पोलिसांनी जीवावर उदार होऊन काम केले. तर कधी कर्तव्यापलिकडे जात नागरिकांची मदत केली. त्यामुळे तेजस्विनीने पोलिसांनी दिलेली ही उपमा अगदी स्त्युत्य आहे. काल नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी तेजस्विनीने डॉक्टरांच्या रुपातील देवी साकारली होती. त्यामुळे नवरात्रीच्या पुढील दिवसांत तेजस्विनी कोणकोणत्या रुपात पाहायला मिळणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.