Swami Samartha Prakat Din: जाणून घ्या ऑन स्क्रिन स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारा अक्षय मुडावदकर बद्दल काही गोष्टी!
Akshay Mudawadkar | Photo Credits: Instagram

मराठी सिनेमांप्रमाणेच आता टेलिव्हिजन क्षेत्रामध्येही चरित्रकथांना मोठी लोकप्रियता मिळत असल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये सध्या स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मालिका जय जय स्वामी समर्थ मालिका अल्पावधीत घराघरामध्ये पोहचली आहे. या मालिकेमध्ये स्वामींची मूळ भूमिका साकारणार्‍या कलाकाराबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. त्याने साकारलेली स्वामींची भूमिका अनेकांचे लक्ष वेधून घेत असल्याने हा कलाकार कोण हा प्रश्न तुमच्यादेखील मनात असेल तर जाणून घ्या ही भुमिका साकारणार्‍या अक्षय मुडावदकर (Akshay Mudawadkar) बद्दल. Swami Samarth Prakat Din Images 2021: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!

अक्षय मुडावदकर मूळचा नाशिकचा आहे. याने जय स्वामी समर्थ मालिका करण्यापूर्वी नाटक, मालिकांमध्येही काम केले आहे. मॉडेल म्हणून तो कलाक्षेत्रामध्ये आला. 2019 साली त्याने शॉर्ट फिल्म 'अ पिस ऑफ पेपर' मध्ये काम केले आहे. त्यानंतर स्वराज्य जननी जीजामाता या मालिकेचा देखील भाग होता. मराठी रंगभूमीवर अक्षय ' गांधी हत्या आणि मी' मध्ये देखील काम करतो. पण सध्या अक्षय 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमधून आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाला आहे. ETTimes सोबताना त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेत असल्याचं त्याने म्हटलं होतं. या भूमिकेच्या बारकाव्यांसाठी त्याने खास अ‍ॅक्टिंग वर्कशॉप्स केले आहेत.

आज स्वामी स्मर्थ प्रकट दिन विशेष भागामध्ये स्वामी आदिमायेचं रूप धारण करणार आहेत त्यासाठी देखील रसिकांच्या मनात विशेष उत्सुकता आहे. (वाचा - स्वामी समर्थ प्रकट दिन : अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!)

स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक होते. सोलापूर जवळील अक्कलकोट हे त्यांचे मूळ क्षेत्र आहे. यंदा कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अक्कलकोट मधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांना प्रवेशबंदी आहे पण अक्षय सध्या घराघरामध्ये त्यांची भूमिका साकारत भाविकांच्या भेटीला टेलिव्हिजनच्या माध्यमातून येत आहे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.' असा मंत्र देणार्‍या स्वामी समर्थांचे तारकमंत्र, आरती, जपमंत्र हे त्यांच्या भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.