Swami Samarth Prakat Din Images 2021: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!
Swami Samarth Prakat Din HD Images 2021 (PC - File Image)

Swami Samarth Prakat Din Images 2021: महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे इसवी सन 1856 ते 1878 19 व्या शतकात दत्त संप्रदायात स्वामी समर्थ महाराज एक थोर संत होऊन गेले. पौराणिक आख्यायिकेनुसार, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.

आंध्रप्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळी कर्दळीवनातून स्वामी समर्थ प्रकट झाले, असं म्हटलं जातं. इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. तेव्हापासून दरवर्षी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा केला जातो. आज सर्वत्र स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा होत आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही स्वामी समर्थांच्या भक्तांना सोशल मीडियाद्वारे Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - स्वामी समर्थ प्रकट दिन : अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!)

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din HD Images 2021 (PC - File Image)

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त

तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din HD Images 2021 (PC - File Image)

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din HD Images 2021 (PC - File Image)

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

Swami Samarth Prakat Din HD Images 2021 (PC - File Image)

लागला ध्यास स्वामी नामाचा

नाम स्वामींचे मुखी वसले,

मी पण माझे संपून गेले,

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din HD Images 2021 (PC - File Image)

दरम्यान, स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरात आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778 होता. स्वामी समर्थांना त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यांनी लोकांना योग्य मार्गदर्शन केले. स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. मात्र, आजही लोकांमध्ये स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा आहे.