'देवमाणूस' फेम किरण गायकवाड याने मास्क योग्यरित्या न वापरल्यास कसे मृत्यूला कवटाळाल हे फोटोमधून नागरिकांना समजावण्याचा केला प्रयत्न, See Pic
Kiran Gaikwad (Photo Credits: Instagram)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधील विक्षिप्त डॉक्टरांची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) घराघरात पोहोचला. याच किरण गायकवाड याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना मोलाचा संदेश दिला आहे. कोरोना काळात मास्कचा योग्यरित्या वापर न केल्यास त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात हे त्याने आपल्या अनेक फोटोंजचा कोलाज केलेला फोटो सोशल मिडियावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटो छान कॅप्शन दिले आहे.

'ज्याला समजलं त्याला उमजलं' असे या फोटोला किरणने कॅप्शन दिले आहे. यात पहिल्या फोटोमध्ये किरणने आपल्या तोंडाला योग्यरित्या मास्क लावला आहे. मात्र नंतरच्या फोटोजमध्ये चुकीच्या पद्धतीने आणि अखेर मास्क न लावल्याने व्यक्ती दगावण्याचीही शक्यता आहे, हे सांगणारा फोटो शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Madhuri Dixit ने व्हिडिओच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने मास्क घालणा-यांची घेतली शाळा, Watch Video

या फोटोला अनेकांनी छान कमेंट्स दिल्या असून फोटोच्या माध्यमातून किरणने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या फोटाला काही चाहत्यांनी 'तू असा फोटो का ठेवलास' असेही विचारले आहे. मात्र यामध्ये लोकांमध्ये मास्क घालण्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी हा एकच प्रयत्न आहे हे या फोटोमधून दिसत आहे.

किरण गायकवाडच्या कामाविषीय बोलायचे झाले तर, देवमाणूस या मालिकेपूर्वी त्याने 'लागिरं झालं जी' या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने भैय्यासाहेबांची भूमिका साकारली होती.