देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरश: थैमान घातला आहे. याला केवळ आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरण्यापेक्षा लोकांचा हलगर्जीपणा देखील तितकाच कारणीभूत आहे. मास्कचा नीट वापर न करणे हेदेखील यामागील कारण आहे. म्हणून धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit-Nene) हिने व्हिडिओच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने मास्क (Mask) घालणा-यांची शाळा घेतली आहे. तसेच व्हिडिओद्वारे योग्य मास्क घालण्याची पद्धत सांगितली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माधुरीने एका प्रकारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.
लोक कोणकोणत्या चुकीच्या पद्धतीने चेह-यावर मास्क लावतात हे माधुरीने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तसेच तोंडाला योग्य रित्या मास्क कसा लावावा हे तिने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे.हेदेखील वाचा- Madhuri Dixit ने तिच्या खास अंदाजामध्ये ‘Bajre Da Sitta’ trend मध्ये उडी घेत शेअर केला व्हिडिओ
View this post on Instagram
माधुरीने या व्हिडिओमध्ये गळ्याला, डोळ्याला, नाकाखाली मास्क लावणे ही चुकीची पद्धत आहे असे सांगितले आहेत. तसेच तुमचे तोंड आणि नाक मास्कमध्ये आले पाहिजे ही मास्क लावण्याची योग्य पद्धत असल्याचे माधुरीने सांगितले आहे.
माधुरी सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या डान्स व्हिडिओसह अनेक मजेशीर, पाककृतीचे व्हिडिओज ती सोशल मिडियावर शेअर करते. त्यामुळे सोशल मिडियावर देखील तिचे असंख्य चाहते तिला फॉलो करतात.