Madhuri Dixit ने तिच्या खास अंदाजामध्ये ‘Bajre Da Sitta’ trend मध्ये उडी घेत शेअर केला व्हिडिओ
Madhuri Dixit Performs to Viral ‘Bajre da Sitta’ Trend (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडमध्ये डान्सिंग क्वीन कोण? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच अनेकांच्या मनात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चा चेहरा येतोच. माधुरी दीक्षितने तिचं वैविध्य केवळ अभिनयातून नव्हे तर डान्समधूनही वेळोवेळी दाखवलं आहे. सध्या सोशल मीडियातही तिचा वावर आहे. कधी योगा, कधी फॅमिलीसोबतचा क्वालिटी टाईम व्यतित करतानाचे तिने काही क्षण ती सोशल मीडीयात शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर बाजरे दा सिट्टा (Bajre Da Sitta) ट्रेंड मध्ये सहभागी होत लूक रिव्हिल केला आहे. Madhuri Dixit ने आपल्या पतीसह बनवले महाराष्ट्रीयन पदार्थ 'कांदेपोहे', डॉ. श्रीराम नेनें नी सांगितला आपल्या आजीचा एक किस्सा, Watch Video.

सोशल मीडीयात सध्या बाजरे दा सिट्टा या गाण्याचा ट्रेंड लोकप्रिय आहे. अनेक कंटेट क्रिटएर्स यामध्ये प्री आणि पोस्ट मेकअप लूक गाण्याच्या चालीसोबत शेअर करत आहेत. माधुरी दीक्षित देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होताना पहिल्या सिक्वेन्समध्ये नो मेकअप लूक आणि बोअर दिसत आहे. तर दुसर्‍या सिक्वेन्समध्ये फ्रेश आणि ग्लॅमरस अंदाजात सार्‍यांसमोर येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरी दीक्षित सध्या डांस दिवाने 3 या शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याच सेटवर ग्रीन रूम मध्ये तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. माधुरीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. अनेकांनी इंस्टावर कमेंट सेक्शनमध्ये तिच्या चिरतरूण सौंदर्यासोबत नव्या ट्रेंडला तिच्या स्वॅगमध्ये सादर करताना पाहून कौतुकही केले आहे.

सध्या माधुरी दीक्षित बॉलिवूड मध्ये मोजकीच कामं करताना दिसत आहे. कलंक हा तिचा शेवटचा सिनेमा होता.लवकरच माधुरी नेटफ्लिक्सच्या Finding Anamika मध्ये दिसेल. तिच्यासमोर अभिनेता संजय कपूर असणार आहे.