आदिनाथ कोठारे करत आहेत निर्मितीत पदार्पण; 'इच्छाधारी नागीण' असलेली मालिका आता मराठीतही
Adinath Kothare (Photo Credits: Facebook)

हिंदी मालिकांमधून गाजत असलेला 'इच्छाधारी नागीण' हा विषय मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच हाताळण्यात येणार आहे. 'प्रेम, पॉयजन, पंगा' या झी युवाच्या आगामी मालिकेतून हा विषय प्रेक्षनकांच्या भेटीस आणणार आहेत आदिनाथ कोठारे.

आदिनाथने आजवर अनेक सिनेमा व मालिकांमधून अभिनय केला आहे. परंतु आता पहिल्यांदाच हा हुरहुन्नरी कलाकार निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

'इच्छाधारी नागीण' ही नेहमीच नकारात्मक भूमिका दाखवण्यात आली आहे. पण हे समीकरण बदलून, एक हवीहवीशी प्रेमळ नागीण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मुख्य भूमिकेतील कलाकार म्हणून, दोन नवे चेहरांना संधी देण्यात आली आहे.

'या' मराठी अभिनेत्रीला ऑडिशनसाठी व्हायला सांगितले होते नग्न; वाचा तिने सांगितलेला धक्कादायक प्रसंग

निर्माता म्हणून पदार्पण करणारे आदिनाथ कोठारे, या नव्या अनुभवाविषयी बोलताना म्हणतात,

"इच्छाधारी नागीण या विषयावर एखादी मालिका सुरु करायची एवढाच विचार डोक्यात होता. पण, या संकल्पनेविषयी आणखी चर्चा सुरु झाली, आणि त्यानंतर या विषयाने एक वळण घेतलं. त्यामुळे हलकीफुलकी पण तरीही 'मॅड' अशी एक भन्नाट विनोदी मालिका तयार झाली. म्हणूनच तिला 'प्रेम, पॉयजन, पंगा' असं निराळं नाव देण्यात आलं. 'इच्छाधारी नागीण' हा विषय वेगळ्या प्रकाराने मांडण्यात येतो आहे. एक उत्तम 'सिटकॉम' पाहण्याची संधी आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत."