Aapla Marathi Bigg Boss Season 2: अभिजित बिचुकले हे महेश मांजरेकर यांच्या सल्लाने आव्हानांचा सामना करणार का?
Abhijeet Bichukale | (Photo credit: YouTube)

Aapla Marathi Bigg Boss Season 2: आपला मराठी बिग बॉस 2 हा एका खासगी मराठी टीव्ही सुरु होऊन आता एक आठवडा झाला. ठरल्याप्रमाणे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी शनिवार, रविवारी घरातील स्पर्धकांची शाळाही घेतली. या शाळेत बिग बॉसच्या घरातील सर्वांच्या डोक्याला ताप होऊन बसलेले स्पर्धक अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) हे मांजरेकर गुरुजींच्या शाळेत तर पास झाले. पण, बिचुकले पास झाले म्हणूण त्यांचा मार्ग सोपा नव्हे तर अधिकच कठीण होऊन बसणार आहे. यातील दोन गोष्टी किमान सुरु आठवड्यासाठी बिचुकले यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

पँटची चेन तोंडाला लाव

शनिवार, रविवारच्या शाळेत मांजरेकर सरांनी अभिजित बिचुकले यांचे कौतुक केले. बिग बॉस हा गेम कळलेल्या चार स्पर्धकांपैकी एक म्हणूनही बिचुकले यांचा सन्मान झाला. त्यामुळे बिचुकले यांचा आत्मविश्वास काहीसा वाढला आहे हे नक्की. पण, बिचुकले यांचा बोलिभाषेतील खास शब्दांचा शब्दकोश आणि त्याचा चपखल वापर करत बिचुकले घरात चालवत असलेला तोंडाचा पट्टा, यावर मात्र मांजरेकरांनी आपल्या खास शैलीत बिचुकले साहेबांना एक सल्ला दिला. तो सल्ला म्हणजे आपल्या पँटची आर्धी चेन कापून तोंडाला लावण्याचा. या शालजोडीचा सरळ अर्थ असा की, बिचुकले साहेब जरा आपली सततची बडबड बंद करा. पहिला आठवडा तर संपला आता पाहूया आता सुरु झालेल्या नव्या आठवड्यात बिचुकले महोदय हे आव्हान कसे पेलतात. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2 Day 1 Episode Preview: बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्याच दिवशी शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचकुले मध्ये काहीतरी बिनसले, पाहा व्हिडिओ)

टीम सदस्याला विरोधी टीममध्ये पाठवणे

बिग बॉसने अभिजित बिचुकले यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बिग बॉसने अभिजित यांना टास्क दिला आहे की, त्यांच्या टीममधून एका सदस्याला त्यांना विरुद्ध असलेल्या स्पर्धक टीममध्ये पाठवायचे आहे. हे नाव सुचवताना बिचुकले यांची कसोटी लागणार आहे. कारण, स्पर्धक सुरेखा पुणेकर यांनी तर 'माझे नाव जर घेतलेस तर तुला आडवंच करते बघ!' अशी थेट धमकीच दिली आहे. टीममधील इतर स्पर्धकांची मनस्थितीही याहून वेगळी नाही. त्यामुळे पाहूया अभिजित बिचुकले अवघड निर्णय कसा सोपा करतायत.