झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा सुळसुळाट, 7 ऑगस्टपासून सुरु होणा-या 2 नवीन मालिका
Bhago Mohan Pyare and Alti Palti Sumdit Kalti serial (Photo Credits: Instagram)

घराघरात पोहोचलेली आणि गेली कित्येक वर्षे एकाहून एक सरस मालिका देऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची एकामागोमाग रीघच लागलीय असं म्हणायला हरकत नाही. मागील 2 महिन्यात झी मराठी दोन नवीन मालिका सुरु झाल्या आहेत. मिसेस मुख्यमंत्री (Mrs. Mukhyamantri) आणि अग्गंबाई...सासूबाई (Aggabai Sasubai) अशी मालिकांची नावे असून या मालिकांचे विषय खूपच हटके आणि वेगळे आहेत. त्यातच भर म्हणून आता झी मराठी येत्या ऑगस्ट आणखी 2 नवीन मालिका सुरु होणार आहेत. 'भागो मोहन प्यारे' (Bhago Mohan Pyare) आणि 'अल्टी-पल्टी सुमडीत कल्टी'(Alti Palti Sumdit Kalti) अशी या मालिकांची नावे असून येत्या 7 ऑगस्टपासून या मालिका झी मराठीवर सुरु होतील.

येत्या 7 ऑगस्टला बुधवार ते शनिवार रोज रात्री 9.30 'भागो मोहन प्यारे' ही मालिका झी मराठीवर आपल्या भेटीला येणार आहे. ही मालिका याआधी आलेल्या जागो मोहन प्यारे या मालिकेचा सिक्वेल आहे. यात मुख्य भूमिकेत अतुल परचुरे (Atul Parchure) असून त्याची सहअभिनेत्री म्हणून सरिता मेहेंदळे (Sarita Mehendale) दिसणार आहे.

याच दिवशी बुधवार ते रविवारी रात्री 10.00 वाजता 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी' ही नवीन मालिका देखील सुरु होणार आहे. यात लागिरं झालं जी फेम शितली म्हणजेच शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि चेतन वडनेरे (Chetan Vadnere) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात हे दोघे ठगाच्या म्हणजेच चोराच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा- झी मराठी ची नवी मालिका, ‘अग्गंबाई सासूबाई’; तेजश्री प्रधान आणि निवेदिता जोशी उलगडणार सासू सुनेचे नवे नाते (Video)

यांच्या प्रोमो वरुन तरी या दोन्ही मालिका थोड्या हटके आणि मजेशीर असतील असे दिसतय. मात्र या मालिका इतर मराठी वाहिनीवरील मालिकांना तगडी टक्कर देणार का हे लवकरच कळेल.