अंगावर शहारे आणणारा 'तुंबाड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडीओ)
तुंबाड (Photo credit : W3LiveNews.com)

अंगावर शहारा आणणारा ‘तुंबाड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरवरून हा चित्रपट अतिशय गूढ आणि रहस्यमय म्हणजेच हॉरर मिस्ट्री असल्याचे जाणवते. या चित्रपटाची निवड व्हेनिस फिल्म फेस्टिवलसाठी झाली होती. येत्या 12 ऑक्टोबर रोजी हा  चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हॅपी भाग जायेगी, रांझना, तनु वेड्स मनू अशा गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आनंद एल राय हे तुंबाडचे निर्माते आहेत.

तुंबाडची कथा 1920 या काळातली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठीत ब्राहमण कुटुंबातील तीन पिढ्यांभोवती ही कथा फिरते. चित्रपटाचे साऊंड इफेक्ट्स आणि सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

या चित्रपटात सोहम शाह, ज्योती मालशे, अनिता दाते, दिपक दामले यांच्या प्रमुख भूमिका असून, राही अनिल बर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.