Mard Mavala Song Out: मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संघर्षयोध्दा असं या चित्रपटाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चां चालू होती. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, पहिलं गाण रिलीज झालं. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं गाणं मर्दमावळा रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं ऐकून प्रेक्षकांच्या पसंती आले आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मर्दमावळा युट्युबला रिलीज करण्यात आले आहे. काही तासांच्या आत हजारो लाईक्स या व्हिडिओल आले आहे. हे गाणं दिव्यकुमार यांनी गायलं आहे. मंनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने केले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आंदोलने केल्या त्या ठिकाणचे चित्रण व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. (हेही वाचा- लाल सलवार, पंजाबी पारंपारिक पोशाख...तापसी पन्नू आणि मॅथियास बोई यांच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल
संघर्षयोध्या चित्रपटाचे दिग्दर्शकाची धुरा शिवाजी दोलताडे यांनी केली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती देखील केली आहे. यासोबतच या चित्रपटाच अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.