Taapsee Pannu Wedding Video : तापसी पन्नू (Taapsee Pannu)ने 23 मार्च रोजी उदयपूर येथे एका खाजगी समारंभात तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोई (Mathias Boe)याच्यासोबत लग्न केले होते. दोघांकडूनही अद्याप त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो जारी करण्यात आले नव्हते. मात्र, आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील एक व्हिडिओ(Taapsee Pannu Wedding Video) समोर आला आहे. ज्यात, तापसी मॅथियास याच्या दिशेने डान्स करत जाताना दिसत आहे. पंजाबी वधूच्या पारंपारिक लाल सलवार सूट पोशाखात तापसी अत्यंत सुंदर दिसत आहे. तर मॅथियास बोई यानेही शेरवानी घातली आहे.(हेही वाचा :Taapsee Pannu To Marry Boyfriend Mathias Boe: तापसी पन्नू लवकरच विवाह बंधनात अडकणार? बॅडमिंटनपटूसोबत करणार लग्न )

Taapse Pannu Wedding Video

byu/PinPitiful inBollyBlindsNGossip

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)