Spruha Joshi आपले Diwali Plans सांगताना झाली भावुक; घरच्यांना करतेय Miss
Spruha Joshi (Instagram)

दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढायचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र अपवाद आहे. स्पृहाची यंदाची दिवाळी तिच्या घरच्यांसोबत नसणार आहे. या वेळी ती एकटी भोपाळला आहे. आणि त्यामुळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.

स्पृहा जोशी ह्याविषयी सांगते, “सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी जातील. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी असणार आहे.” (हेही वाचा. Happy Diwali 2019: Zee Marathi चे कलाकार सांगत आहेत त्यांचे ह्या वर्षीचे दिवाळी Plans)

स्पृहा जोशी पुढे म्हणते, “खरं तर, दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता, की, दिवाळीला तर घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदा घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशा वेळी जाणवतं, की, सणाच्या दिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.”

स्पृहा जोशी लवकरच विक्की वेलिंगकर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.