Sonali Bendre Cancer : केमोथेरेपीनंतर अलीकडे स्क्रिप्ट लक्षात ठेवण कठीण होतयं...; सोनाली बेंद्रेने पहिल्यांदाच सांगितली 'ही' समस्या
Photo Credit -X

Sonali Bendre Cancer : नव्वदच्या दशकात शाहरूख, सलमान, आमिर यांची हिरोइन राहिलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आपल्या 'द ब्रोकन न्यूज' या सीरीजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजचे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. त्या दरम्यानच, दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे तिच्या पोस्ट केमोथेरेपी (Post Chemotherapy)बद्दल बरीच बोलती झाली. केमोचा आपल्या तब्येतीवर कसा परिणाम होतो, हे तिने पिंकविलाशी बोलताना मुलाखतीत सांगितलं आहे. 'आधी स्क्रिप्ट वाचल्यानंतर जसे डायलॉग लक्षात रहायचे. तसे आता होत नाही. डायलॉग लक्षात ठेवण्यासाठी आता खूप वेळ घ्यावा लागतो कदाचित स्मरणशक्ती कमी (Memory Problem) झाली आहे,' असे तिने मुलाखतीत म्हटले आहे. (हेही वाचा:Cancer Capital of The World: भारत बनला 'जगातील कॅन्सरची राजधानी'; कर्करोग प्रकरणांमध्ये होत आहे झपाट्याने वाढ, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती )

'द ब्रोकन न्यूज' या सीरीजमध्ये सोनाली, जयदीप अहलावत आणि श्रिया पिलगांवकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये हे कलाकार अनेक विषयांवर व्यक्त झाले. यामध्ये सोनाली बेंद्रेने आपल्या खासगी जीवनातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. '2018 साली कॅन्सर झाल्याचं कळलं. मात्र यावेळी हार मानली नाही आणि धैर्याने रोगाचा सामना केला आणि कॅन्सरचा पराभव केला. आता पूर्णपणे बरी आहे, पण आता या आजाराचे परिणाम भोगावे लागत आहेत. आधी एकदा स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती संपूर्ण मला लक्षात राहायची. पण, या आजारातून बरं झाल्यानंतर गोष्टी पहिल्या सारख्या राहिल्या नाहीत. हे कठीण आहे की नाही हे मला माहित नाही. परंतु अलीकडे जेव्हा स्क्रिप्ट वाटते तेव्हा ती पहिल्यासारखी लक्षात राहत नाही. मात्र, केमोनंतर स्क्रिप्ट लक्षात ठेवण्यासाठी त्याला अधिक वेळ लागतो.' असे सोनाली म्हटली.

ती सोनाली बेंद्रे म्हणाली की, 'आजकाल डायलॉग लक्षात ठेवण्यासाठी थोडा जास्त वेळ काढावा लागतो. केमोमुळे स्मरणशक्ती कमी होते. वय वाढत चाललं आहे की नाही हे कळत नाही. पण हा बदल जाणत आहे आणि माझ्यासाठी हे विचित्र आहे.

2018 मध्ये सोनालीला स्टेज फोर कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले आणि 2021 मध्ये ती कर्करोगमुक्त झाली. तेव्हापासून ती कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करत आहे आणि जनजागृती करत आहे.